यांच्यावर केली जात आहे कारवाई
नो पार्किंगमध्ये वाहन लावणे, वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे, भाई, दादा, भाऊ अशा फॅन्सी नंबर प्लेट लावणे, प्रेशर हॉर्न वाजविणे, सीट बेल्ट न वापरणाऱ्या वाहनांवर ही कारवाई केली जात आहे. ही कारवाई केवळ बुलडाणा शहरापर्यंत मर्यादित नसून, संपूर्ण जिल्हाभर राबविली जात आहे.
३० पोलीस कर्मचारी पथकात
वाहतूक पोलीस सध्या अलर्ट मोडवर असल्याने बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पथकातील एकूण ३० पोलीस कर्मचारी कारवाईसाठी सध्या रस्त्यावर उतरले आहेत. यामध्ये काही अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
नागरिकांना वाहतूक नियमांची ओळख करून देण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. यामुळे वाहतूक नियंत्रणात येऊन अपघाताचे प्रमाण कमी होईल हा यामागील उद्देश आहे.
-ज्ञानेश्वर घुगे, पोलीस उपनिरीक्षक, बुलडाणा.