शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे कार्यकर्ता जय मालोकर मृत्यू प्रकरणी वेगळं वळण; हृदयविकारानं मृत्यू नाही, तर...
2
‘एक देश, एक निवडणूक’ला मंजुरी; कोविंद समितीच्या शिफारशीनुसार प्रस्तावावर मंत्रिमंडळाची माेहाेर
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक देवाण-घेवाण करू नका!
4
ईदला लाउडस्पीकर लावणे हानिकारक : हायकाेर्ट, न्यायालयाने याचिका निकाली काढली
5
महिला मुख्यमंत्रीवरुन राजकीय चर्चा जोरात; वर्षा गायकवाड यांच्या विधानानंतर मविआत वेगवेगळी मते
6
पुतिन यांना सिक्रेट गर्लफ्रेंडपासून दोन मुलं ! गर्लफ्रेंड एलिना कबेवा आंतरराष्ट्रीय दर्जाची रिदमिक जिम्नॅस्ट
7
दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला
8
श्रीमंतांचा मोठा दबदबा, ५ वर्षांत विक्रमी कमाई; वर्षाला १० कोटी कमावणाऱ्यांची संख्या ३१,८०० वर
9
राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या; भाजप खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य, फौजदारी गुन्हा दाखल
10
कामात समाधान नसल्यास दोन वर्षांत सोडणार नोकरी; ४७% तरुण नोकरी सोडण्याच्या तयारीत
11
गडकरी दिल्लीत सगळ्यांना आवडतात; ते का?
12
आतिशी शनिवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ ? केजरीवालांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला
13
आतापासूनच करा मुलांच्या पेन्शनची सोय; ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेला सुरुवात
14
महामुंबईत गणरायाला भावपूर्ण निरोप, पुढच्या वर्षी लवकर येण्याची भक्तांची गळ
15
मुंबई विमानतळावर एक कोटीचे सोने जप्त; पाच विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक
16
मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस वे’वर वाटमारी, पाच अटकेत; तीन फरार; पनवेल पोलिसांची कारवाई
17
नवी मुंबईतील १२ हजार कोटींच्या सेमी कंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन, उद्योजकांना त्रास दिल्यास तुरुंगात टाकू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
18
रेल्वे अधिकाऱ्याची नऊ लाखांची फसवणूक; गैरव्यवहारात अटक करण्याची भीती दाखवून फसवले
19
शासकीय रुग्णालयांत आता सौर ऊर्जेचा उजेड; वैद्यकीय शिक्षण विभागाची मंजुरी
20
मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचे जशास तसे प्रत्युत्तर; वडीगोद्री येथे उपोषण सुरु करणार!

आता वीकेंड घरातच, हॉटेलिंग राहणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 11:21 AM

Now the weekend is at home, the hotel will be closed : वीकेंडला हॉटेलिंग बंद राहणार असल्याने शहराचे रुळावर येणारे अर्थकारणही पुन्हा अडचणीत येण्याची भीती आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : उन्यापुऱ्या जवळपास १५ दिवसांच्या अनलॉकनंतर जिल्ह्यात पुन्हा तिसऱ्या स्तराचे निर्बंध लावण्यात आल्याने बुलडाणा शहरातील हॉटेलिंग व्यवसायालाही फटका बसणार आहे. वीकेंडला हॉटेलिंग बंद राहणार असल्याने शहराचे रुळावर येणारे अर्थकारणही पुन्हा अडचणीत येण्याची भीती आहे. बुलडाणा शहरात छोटी-मोठी मिळून जवळपास ३० च्या आसपास हॉटेल्स आहेत. त्याद्वारे जवळपास ३०० ते ४०० जणांना रोजगार मिळतो. बुलडाणा हे नोकरदारांचे शहर म्हणून अेाळखले जाते. शहरातील जवळपास ६६ टक्के नागरिक हे नोकरदार आहेत. त्यामुळे आठवड्याच्या शेवटी एन्जाॅय करण्याची मानसिकता साधारणत: आढळते. त्यातल्या त्यात शहरातील २१ टक्के महिला नोकरी करतात. त्यामुळे हॉटेलमध्ये सुटीच्या दिवशी जेवणास जाण्याची एक पद्धत  २०१० च्या दशकामध्ये शहरात रुढ झाली.  गेले वर्ष कोरोनाच्या धास्तीत गेले. कधी अनलॉक तर कधी लॉकडाऊन अशा चक्रात बुलडाणा शहरच काय संपूर्ण जिल्हा अडकलेला होता. गेल्या १५ दिवसांत हॉटेल, छोटी उपहारगृहे सुरू झाली होती. अर्थचक्र फिरावयास लागले होते. हॉटेल्सध्येही गर्दी वाढू लागली होती. मात्र, पुन्हा तिसऱ्या स्तराचे निर्बंध सोमवारपासून लागू करण्यात आल्यामुळे सकाळी ७ ते ४ या वेळेतच ५० टक्के क्षमतेने हॉटेल्स सुरू राहतील. वीकेंडला मात्र हॉटेल्समध्ये जाऊन जेवण करण्याच्या मनसुब्यांवर आता पाणी फेरले गेले आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसायाला फटका बसणार आहे.

५ कोटींची उलाढाल ठप्पजिल्ह्यात छोटी-मोठी मिळून जवळपास ३ हजारांच्या आसपास हॉटेल्स असून त्यावर सुमारे ५ हजार जणांचे अवलंबित्व आहे. यामधून वर्षाकाठी ५ कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याचा अंदाज आहे. कोरोनामुळे हे संपूर्ण अर्थचक्र ठप्प झाले आहे. आता वीकेंडलाही हॉटेलिंग बंद राहणार असल्याने आर्थिक उलाढाल ठप्प होऊन घरातच वीकेंड साजरा करावा लागणार आहे.

१०५ लघु व्यावसायिकांचेही नुकसानबुलडाणा शहरात १०५ लघु व्यावसायिक पाणीपुरी, भेळ विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्याकडे साधारणत: ३ व्यक्ती कामाला आहेत. शनिवार, रविवारला प्रामुख्याने यांचा व्यवसाय अधिक होतो. मात्र, आता वीकेंडला सर्वच बंद राहणार असल्याने त्यांच्यासमोरही समस्या आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाhotelहॉटेल