लाभार्थी गुगल प्ले स्टोरवरून हे अॅप डाउनलोड करू शकतात. सध्या कुटुंबातील एका सदस्याकडे तरी स्मार्टफोन असतो. त्यामुळे मोबाइलवर सरकारी योजना आणि मिळणारा लाभ याची पूर्ण माहिती मिळू शकते. ‘वन नेशन - वन रेशन कार्ड’ योजनेच्या पावलावर पाऊल टाकणारे हे अॅप आता लाँच करण्यात आले आहे. रेशन कार्डधारकांना जर आपले निवासस्थान बदलून नवीन ठिकाणी जावयाचे असेल, तर ते नवीन ठिकाणचे रेशन दुकान मोबाइल अॅपवर पाहू शकतात. जवळ कोणते रेशन दुकान आहे. त्या ठिकाणी कोणकोणती सुविधा दिली जात आहे, ही सर्व माहिती शोधण्यासाठी लाभार्थींना या मोबाइल अॅपचा उपयोग होणार आहे.
क्लिकवर मिळणार ही माहिती
लाभार्थींना मिळणारे धान्य, जवळपास असलेले रास्त भाव दुकान, शिधापत्रिकेवर उचललेल्या धान्याची माहिती, शिधापत्रिका पात्र की अपात्र याची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. यामुळे लाभार्थींना किरकोळ कामांसाठी तहसील कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. या ॲपद्वारे तक्रारदेखील करता येईल.
असे करा डाऊनलोड
‘मेरा रेशन’ मोबाइल अॅपचा वापर सोपा आहे. सर्वांत आधी हे अॅप डाउनलोड करा, गुगल प्ले स्टोरवर तुम्हाला अॅप मिळेल. डाउनलोड झाल्यानंतर आपला मोबाइल नंबर यात रजिस्टर करा. रजिस्टर झाल्यानंतर तुमचा रेशन कार्ड नंबर मागितला जाईल. नंबर टाकल्यानंतर सबमिट करा. मग, रेशन कार्डसंबंधी सर्व माहिती मिळू शकेल. या अॅपवर गेल्या सहा महिन्यांतील ट्रान्झक्शन आणि आधार सीडिंगची पूर्ण माहिती तुम्हाला तुमच्या मोबाइलवर मिळू शकेल.
तक्रार नोंदवा अॅपवर
रेशन कार्डधारकांना आपल्या रेशन कार्डबाबत किंवा धान्याबाबत काही तक्रार करावयाची असल्यास त्यासाठी पुरवठा विभाग किंवा तहसील कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. मोबाइल अॅपवर घरबसल्या तक्रार नोंदविता येणार आहे. या अॅपवर विविध सुविधा उपलब्ध आहेत.
५,१८,९४९
जिल्ह्यातील लाभार्थी
८९,४१८
केशरी
६५,५९५
अंत्योदय
२२,३४६
शुभ्र