लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : नगरपालिका कर्मचार्यांच्या विविध मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मेहकर नगरपालिका कर्मचार्यांनी ९ ऑगस्ट रोजी एकदिवसीय सामूहिक रजा आंदोलन केले आहे, तर २१ ऑगस्टपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. न.प. कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, कर्मचार्यांना १00 टक्के वेतन शासनामार्फत द्यावे, जि.प. व पं.स.मधील कर्मचार्यानुसार न.प. कर्मचार्यांना सर्व लाभ द्यावा, सेवानवृत्त कर्मचार्यांचे वय ५८ वरून ६0 करावे, तसेच उपमुख्याधिकारी पदावर पदोन्नती देण्यात यावी, यासह इतर १६ मागण्यांसाठी न.प. कर्मचार्यांनी सामूहिक रजा आंदोलन केले. आंदोलनामध्ये मुख्याधिकारी अशोक सातपुते, संतोष राणे, विशाल शिरपूरकर, श्रीकांत महाजन, विलास जवंजाळ, पवन भादुपोता, सुधीर सारोळकर, रतन शिरपूरकर, शे.महंमद शे.रऊफ, संजय गिरी, बंडू अंबेकर, प्रकाश सौभागे, कडुबा पर्हाड, राजेंद्र बदामे, संजय खोडकेसह सर्व कर्मचारी सहभागी झाले होते, तसेच अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोतीलाल सुनगत, नारायण पचेरवाल, श्याम टाक, प्रकाश ढंढोरे, किशोर मानवतकर, दीपक मानवतकर, उत्तम मानवतकर, किशोर कडोसे, राजू ढंढोरे, प्रताप गोडाले, राजू अवसरमोल, गोकूळ पचेरवाल, मनोज ढंढोरे, संतोष मानवतकर, विनोद दाभाडे, आकाश मोरे आदी सफाई कामगार आंदोलनात सहभागी झाले होते.
काँग्रेसने दिला आंदोलनाला पाठिंबानगरपालिका कर्मचार्यांनी केलेल्या या आंदोलनाला काँग्रेसने आपला पाठिंबा दिला. यावेळी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्याम उमाळकर, नगराध्यक्ष कासम गवळी, अँड. अनंत वानखेडे, कलीम खान, देवानंद पवार, वसंतराव देशमुख, तौफीक खान, अलीयारखान, नीलेश मानवतकर, नीलेश सोमन, मुजीब खान, वामन मोरे आदी उपस्थित होते.
शिवसेनेचा कर्मचार्यांना पाठिंबाकर्मचार्यांनी केलेल्या धरणे आंदोलनाला शिवसेनेनेसुद्धा पाठिंबा दिला. यावेळी गटनेते संजय जाधव, न.पा. उपाध्यक्ष जयचंद बाठिया, समाधान सास्ते, ओम सौभागे, गणेश लष्कर, माधव तायडे, पिंटू सुर्जन, तौफीक कुरेशी आदी नगरसेवक उपस्थित होते.