पोलीस दलात कार्यरत एका महिलेचे खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले, ही बाब संबंधीत महिलेस कळताच, तिला धक्का बसला. प्रकरणी या महिलेने पोलिसात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी ज्या मोबाइल क्रमांकावरून हे फोटो व्हायरल करण्यात आले आहेत, त्या विरोधात विनयभंगासह, आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. १७ ते १८ जुलैच्या दरम्यान ही घटना घडली होती. दुसरीकडे संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे स्पष्ट केले असून, तपास सुरू असल्याचे सांगितले. सोबतच हा तपास सायबर सेलकडे वर्ग करण्यात येत असल्याचे सांगितले.
दुसरीकडे या संदर्भात सायबर सेलचे पोलीस निरीक्षक यांच्याशी संपर्क साधला असता, अनुषंगिक कागदपत्रे तयार झाली असतील. मात्र, अद्याप आपल्यापर्यंत ती पोहोचली नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, या प्रकारामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.