लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा: जिल्हयातील कोराना बाधीतांचा आकडा साडेआठ हजारांच्या टप्प्यात पोहोचला असून रविवारी ४२ जण कोरोना बाधीत आढळून आले. दरम्यान ३९९ जणांचे अहवाल निगेटीव्ह आल्यामुळे संदिग्धांना मोठा दिलासा मिळाला. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेले व रॅपीड टेस्टमध्ये तपासण्यात आलेल्या ४४१ जणांचे अहवाल रविवारी मिळाले. यामध्ये ४२ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले. रॅपीड टेस्टमधील पाच व प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालापैकी ३७ जणांचा यात समावेश आहे. गावनिहाय पॉझीटीव्ह आलेल्यांमध्ये चिखली पाच, इसरूळ एक, दिवठाणा एक, माळशेंबा एक, टाकरखेड हेलगा दोन, दुसरबीड एक, शेलगाव राऊत एक, साखरखेर्डा दोन, बुलडाणा तीन, लोणार चार, किन्ही एक, खामगाव एक, गवंढळा एक, हिवरखेड दोन, शिरसगाव देशमुख एक, खैरा एक, नारखेड दोन, नांदुरा सहा, दाताळा एक, मलकापूर एक, सावरगाव दोन, जळगाव जामोद एक, आणि नाशिक येथील एकाचा पाॅझिटिव्ह आलेल्यांमध्ये समावेश आहे.दरम्यान, ५२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. कोवीड केअर सेंटरनुसार विचार करता नांदुरा आठ, देऊळगाव राजा चार, बुलडाणा चार, मोताळा सात, चिखली दोन, जळगाव जामोद आठ, खामगाव सात, मेहकर दहा, सिंदखेड राजा दोन या प्रमाणे कोरोनामुक्त झालेल्यांना सुटी देण्यात आली. कोराना संदिग्ध म्हणून तपासणी करण्यात आलेल्यांपैकी ३६,४०६ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. सोबतच ७,९१७ कोरोना बाधीतांनी आतापर्यंत कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील काेरोनाबाधीतांची संख्या पोहोचली साडेआठ हजारांच्या टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 11:51 AM