बुलढाणा : जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या आता बारा वर पोहोचली आहे. मंगळवारी पाठविलेले 12 स्वाब नमुन्यांपैकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर 11 अहवाल निगेटिव्ह आले आहे. पॉझिटिव्ह अहवाल आलेला व्यक्ती चिखलीचा राहणारा आहे. त्यामुळे चिखली मधील कोरोना बाधित मुलांची संख्या तीन वर पोहोचली आहे. मंगळवारी बारा जणांची स्वाब नमुने पाठवण्यात आले होते. आतापर्यंत बुलढाणा जिल्ह्यातून एकूण 124 जणांची स्वाब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत . त्यापैकी बहुतांश नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे पैकी बारा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यातील एका रुग्णाचा 28 मार्च रोजी मृत्यू झाला होता. जवळपास अर्धा बुलढाणा जिल्हा कोरोना संसर्गाच्या कचाट्यात सापडला आहे. दरम्यान, बुलडाण्यात कोरोना बाधीत रुग्णांची वाढती लोकसंख्या पाहता आता बुलडाण्यातच आता रॅपीड टेस्टची सुविध अल्पावधीतच उपलब्ध होणार आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून त्याबाबत सकारात्मक निर्णय समोर आला आहे. बुलडाणा जिल्ह्यात सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, चिखली, बुलडाणा, खामगाव आणि शेगाव या सहा तालुक्यात कोरोना बाधीत दहा रुग्ण आढळले असून बुलडाण्यातील एकाचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे या तालुक्यातील संबंधीत रुग्णांच्या घराला केंद्र बिंदून मानून तयार करण्यात आलेल्या हायरिस्क झोनमध्ये तब्बल ५१ हजार २५३ लोकसंख्या राहते. या संपूर्ण लोकसंख्येची आरोग्य तपासणी करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या असून यंत्रणांनी त्यास प्रारंभ केला आहे. सोबतच बुलडाणा जिल्ह्यात लॉकडाऊन अर्थात संचारबंदीचीही १०० टक्के अंमलबजावणी होईल याबाबत निर्देश दिले आहेत. .
CoronaVirus : बुलढाण्यातील कोरोना बाधितांची संख्या 12 वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2020 9:21 AM