लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ३६७ जणांचे अहवाल रविवारी प्राप्त झाले. त्यापैकी ४४ जण कोरोनाबाधित आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ११,८२६ झाली असून, ही संख्या १२ हजाराच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. दरम्यान, सध्या जिल्ह्यात ३२३ सक्रिय रुग्ण आहेत, तर आतापर्यंत ११,३६० बाधितांनी कोरोनावर मात केली आहे.रविवारी प्राप्त ३६७ अहवालांपैकी ३२३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर ४४ जण पॉझिटिव्ह निघाले. यामध्ये चिखली पाच, बुलडाणा पाच, कोलवड एक, देऊळगाव राजा एक, सिंदखेड राजा ३, खामगाव ९, मलकापूर आठ, अनुराबाद एक, मेहकर दोन, अंबाशी एक, अंत्री खेडेकर एक, भोनगाव एक, शेगाव चार, नांदुरा एक आणि जालना जिल्ह्यातील एकाचा समावेश आहे. दुसरीकडे २४ जणांनी रविवारी कोरोनावर मात केली. त्यात खामगाव कोविड केअर सेंटरमधून दोन, बुलडाणा एक, सिंदखेड राजा पाच, देऊळगाव राजा चार, चिखली सहा मोताळ्यातील सहा जणांचा समावेश आहे.
बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या १२ हजारांच्या उंबरठ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 12:31 PM