कोरोनाबाधीतांची संख्या दहा हजारांच्या उंबरठ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2020 5:05 PM
Buldhana News येत्या दोन दिवसात बुलडाण्यातील एकूण बाधीतांची संख्या ही दहा हजारावर पोहोचेल.
लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या दहा हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचली असून शुक्रवारी जळगाव जामोद येथील एका ८५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतकांची संख्या १३० वर पोहोचली आहे. दरम्यान, शुक्रवारी जिल्ह्यात ७६ कोरोना बाधीत आढळून आले तर ५६ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे एकूण कोरोना बाधीतांची संख्या ९,८०३ झाली आहे.याच वेगाने जर कोरोना बाधीत रुग्ण निघाले तर येत्या दोन दिवसात बुलडाण्यातील एकूण बाधीतांची संख्या ही दहा हजारावर पोहोचेल. शुक्रवारी तपासणी करण्यात आलेल्यांपैकी ८७२ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये ७६ जण पॉझिटिव्ह निघाले तर ७९६ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले.पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये चांडोळ दोन, वरवंड दोन, जनुना सात, गवंढाळा तीन, वहाळा खुर्द एक, घानेगाव एक, चिखली एक, गोद्री एक, टाकरखेड भागीले दोन, मोताळा दोन धामणगाव बढे दोन, बोराखेडी एक, कोराळा एक, पान्हेरा खेडी एक, आडविहीर दोन देऊळगाव राजा दोन, सावंगी माळी दोन, खापरखेड दोन, लोणी गवळी एक, लोणी काळे दोन, पिंपळगाव एक, घाटबोरी १, पांगरखेड एक, उमरद दोन, रुम्हणा दहा, सिंदखेड राजा एक, जळगाव जामोद पाच, पळशी सुपो एक, वाडी खुर्द एक, अकोला खुर्द एक, सातळी दोन, वडगाव पाटण तीन, बुलडाणा एक, निवाना एक, मेहकर पाच, खामगाव दोन या प्रमाणे रुग्ण आढळून आले. तर जळगाव जामोदमधील महसूल कॉलनीत असलेल्या ८५ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत १३० जणांचा मृत्यू झाला आहे.