वाढत्या बेफिकिरीने कोरोनाला निमंत्रण
बुलडाणा: शहरात अनलॉकनंतर नागरिकांची बेफिकिरी वाढली आहे. या वाढत्या बेफिकिरीने कोरोना संसर्गाला निमंत्रणच दिल्या जात आहे. बाजार परिसरासह बसस्थानकातही नागरिकांकडून नियमांचे पालन होत नसल्याचे चित्र आहे.
पेट्रोल महागल्याने सायकली बाहेर
बुलडाणा: पेट्रोलचे दर वाढल्याने सायकली बाहेर निघाल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे आता पुन्हा सायकलींची ट्रींग ट्रींग ऐकायला मिळत आहे. सध्या पेट्रोल १०५ रुपये प्रति लीटरने विक्री होत असल्याने सर्वसामान्यांना दुचाकी चालविणे परवडणारे नाही.
कच्च्या कैरीची आवक वाढली
बुलडाणा: जेवणात कैरीचे लोणचे नसेल, तर जेवणाची सारी लज्जत जाते. त्यामुळे वर्षभर पुरेल इतके लोणचे गरीब असो वा श्रीमंत, प्रत्येक घरात बनविले जाते. येथे बाजारात लोणच्यासाठी लागणाऱ्या कच्च्या कैरीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जून महिन्यात लोणचे टाकण्याची लगबग प्रत्येक घरात सुरू होते. त्यामुळे बाजारात सध्या कैरी विक्रेत्यांचे प्रमाणही वाढले आहे.
नेट शेडला वादळाचा तडाखा
मेहकर: तालुक्यात जून महिन्याच्या सुरुवातीलाच वादळासह अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे काही शेतकऱ्यांचे नेट शेडचे नुकसान झाले होते. तर काहींच्या शेतात लावलेल्या सोलर पॅनलचे नुकसान झाले परंतु शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही.