लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : यावर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यातील विविध प्रकल्पामध्ये ३२ टक्के जलसाठा असून, जमिनीखालील पाण्याची पातळी खालावलेली आहे. अशा परिस्थितीत जिल्हा प्रशासनाने संभाव्य पाणीटंचाईग्रस्त गावाचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू केले आहे. सध्या चिखली तालुक्यातील मेरा फाटा येथे एक टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून येणार्या काळात टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढणार आहे.जिल्ह्यात एकूण १२७२ गावे असून, अनेक गावात विविध प्रकल्पावरून पाणी पुरवठा करण्यात येतो; मात्र यावर्षी अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यातील विविध प्रकल्पामुळे २२.१७ टक्के जलसाठा असून दिवसे्दिवस हा जलसाठा खालावत आहे. यावर्षी अत्यल्प पावसामुळे खरीप हंगाम तोट्यात आला असून परतीच्या पावसामुळे शेतकर्यांनी रब्बी हंगामाचे नियोजन केले होते. त्यामुळे विविध प्रकल्पासह जमिनीखालील पाण्याची पातळी घटत आहे. त्यामुळे येणार्या काळात जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढणार आहे. दरवर्षी पाणीटंचाईचा फटका बसून टंचाईग्रस्त गावांची वाढती संख्या पाहता लोणार तालुक्यातील १७, मेहकर तालुक्यातील ६ तसेच जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यात विंधनविहिरी घेण्यावर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय महाराष्ट्र भूजल अधिनियम २00९ मधील कलम २५ नुसार वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा यांच्या अहवालाअन्वये जिल्हा प्रशासनाने संभाव्य पाणीटंचाई घोषित गावांमध्ये अधिसूचित सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोताच्या ५00 मीटर अंतरामध्ये कोणतीही व्यक्ती, कोणत्याही प्रयोजनासाठी विहिरीचे खोदकाम करणार नाही. प्रभाव क्षेत्रामधील किंवा सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतापासून एक किलोमीटर अंतरामध्ये यापैकी जे अधिक असेल अशा क्षेत्रातील विहीर तात्पुरती बंद करून भूजल काढण्यासाठी, विहीत करण्यात येईल. कोणतीही व्यक्ती भूजल पिण्याच्या पाण्याचा स्रोत दूषित करणार नाही, असे प्रशासनाचे आदेश आहेत.
रब्बी हंगामातील सिंचन क्षेत्र कमी होणारयावर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यातील मोठे, मध्यम लघु प्रकल्पात २२.१७ टक्केच जलसाठा उपलब्ध आहे. गेल्या चार वर्षामध्ये यंदा सर्वात कमी जलसाठय़ाची नोंद करण्यात आली आहे. २१ सप्टेंबर रोजीच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात २0१३ साली ४३६ दलघमी, २0१४ मध्ये ३५९ दलघमी, २0१५ मध्ये २६0 दलघमी जलसाठ्याची नोंद करण्यात आली होती. या तुलनेत यंदाच्या जलसाठा सर्वात कमी ११८ दलघमी आहे. त्यामुळे भविष्यात जलसंकट निर्माण होणार असून, यावर्षी रब्बी हंगामातील सिंचन क्षेत्र कमी होणार आहे.