जिल्ह्यात २० मे ते २५ मे दरम्यान ३ हजार २९७ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत, तर २७ हजार ९१९ संदिग्धांची या कालावधीत तपासणी करण्यात आली होती. त्यामुळे या सहा दिवसांचा पॉझिटिव्हिटी रेट हा ११.८० टक्के आहे, तर जिल्ह्याचा प्रोग्रेसिव्ह पॉझिटिव्हिटी रेट हा १५ टक्के आहे आणि हाच रेट १० टक्क्यांच्या खाली आणण्यासाठी सध्या प्रशासकीय यंत्रणा झटत आहे. दरम्यान, कोरानाबाधितांची संख्या सध्या मोठ्या प्रमाणावर घटत असल्याने, येत्या काही दिवसांत जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेटही १० टक्क्यांच्या आसपास आणण्यात प्रशासनाला यश येऊ शकते. मात्र, मृत्युदर नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. कारण गेल्या सहा दिवसांत जिल्ह्यात बाधितांपैकी ४१ जणांचा मृत्यू झाला असून, या सहा दिवसांचा मृत्युदर हा १.२४ टक्के आहे.
बाधितांचे प्रमाण घटले, पण मृत्युदर वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 4:36 AM