खामगाव : बाल संगोपन हा तसा अत्यंत संवेदनशील विषय असून बालकाच्या निकोप वाढीसाठी शास्त्रशुध्द बाल संगोपन काळाची गरज आहे. प्रत्येक बालकाला भरवला जाणारा एक-एक घास त्याच्या आहार विषयक गरजा लक्षात घेवून परिपूर्ण केला पाहिजे.आई होणं हा प्रत्येक स्त्रीच्या जीवनातील उत्कृष्ट क्षण असतो. मानसिक समाधन देणारा अत्यानंद असतो. म्हणून बालकांचे सु-संगोपन करताना आहार शास्त्राची माहिती करुन घ्यायला हवी. आजची मूलं देशाचे भावी - आधारस्तंभ असल्याने, प्रत्येकाच्या संगोपनावर काळजीपूर्वक भर देणे आवश्यक आहे. बाळाची वाढ होते तसे त्याच्या उंची व वजन याच्यात बदल होत जातात. ते प्रमाणात होत असेल तर बाळ सुदृढ होते. आवश्यक अन्न घटक रोज मिळतील आणि बालकांचा सर्वांगीण विकास याकडे लक्ष देण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)
बाळाच्या निकोप वाढीसाठी शास्त्रशुध्द संगोपन आवश्यक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2019 2:53 PM