गायी पालनातून शेतकऱ्याने साधली प्रगती
किनगाव जट्टू : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीला लागलेला खर्च वसूल होत नसल्याने शेतीला जोडधंदा सुरू करून भुमराळा येथील शेतकरी लक्ष्मण टेकाळे यांनी गायी पालनातून आर्थिक प्रगती साधली आहे. केवळ दूध विक्रीच नव्हे, तर दुधापासून होणाऱ्या पदार्थांची विक्री करून शेतकऱ्याने बेरोजगारीवर मात केली आहे.
रस्त्यावरील धुळीमुळे पिकांना फटका
दुसरबीड : तढेगाव फाटा ते देऊळगावमही रोडवरील समृद्धी महामार्गाच्या कामासाठी जाणाऱ्या वाहनांच्या वर्दळीमुळे रस्त्यालगतच्या शेतांना धुळीचा फटका बसत आहे. त्यामुळे तूर पिकाचे नुकसान होत आहे.
मुख्य रस्त्यावर खाेदला पाट
देऊळगाव राजा : खकडपूर्णा पाटाकरिता अधिग्रहित केलेल्या जमिनीचा वापर न करता ग्रामस्थांचा मुख्य रस्ता व नाली ताेडून पाटाचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांचे नुकसान हाेणार आहे. ग्रामस्थांनी उपअभियंत्यांना निवेदन दिले आहे.