बुलडाणा- तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावरील दहशतवादी हल्ल्याचा विरोध म्हणून दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस पाळण्यात येतो. या दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रतिज्ञा दिली. आम्ही भारताचे नागरिक, आपल्या देशाच्या अहिंसा व सहिष्णूतेच्या परंपरेविषयी दृढ निष्टा बाळगून सर्व प्रकारच्या दहशतवादाचा व हिंसाचाराचा सामना करू, अशी शपथ घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र टापरे यांच्यासह तहसिलदार सुरेश बगळे व विविध विभागतील अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते
दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त जिल्हाधिकारी यांनी दिली प्रतिज्ञा
By admin | Published: May 21, 2017 1:49 PM