--क्वारंटीन संदर्भात ३९ व्यक्तींवर गुन्हे--
लॉकडाऊन दरम्यान कोरोना संसर्गाचे वाढते प्रमाण पाहता संदिग्धांना क्वारंटीन करण्यात येत होते. मात्र या नियमांचे उल्लंघन केल्या जात होते. पोलिसांनाही जुमानल्या जात नव्हते. त्यामुळे अशा प्रकरणातील गुन्ह्यांमध्ये ३९ व्यक्ती आरोपी होते. १५ प्रकरणांचा जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय स्तरावरून तपास केल्या गेला होता.
--११ टक्क्यांनी वाढली गुन्हेगारी--
कोरोना संसर्गामुळे जिल्ह्यात पोलिस कर्मचाऱ्यांवर ताण वाढला होता. तपासणी नाके, प्रतिबंधीत क्षेत्रात पोलिसांना कर्तव्यावर ठेवण्यात आले होते. त्यामुळे बऱ्याच पोलिसांनाही कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे लॉकडाऊन काळात गुन्ह्यांचे प्रमाण वाढले होते. परिणामस्वरुप २०१९ च्या तुलनेत २०२० या वर्षात जिल्ह्यात ११ टक्क्यांनी गुन्हेगारी वाढल्याचे समोर आले होते. वास्तविक जेथे २,७३२ पोलिस कर्मचाऱ्यांची गरज असताना केवळ २६०० पोलिस कर्मचारी या कालवधीत कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासोबतच कोरोना प्रतिबंधाच्या कालावधीत फ्रंटलाईन वर्कर्स म्हणन काम करत होते. त्याततही ३३ पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचीही पोलिस दलात कमतरता होती. आताही मनुष्यबळाच्या बाबतीत असेच चित्र आहे. त्यामुळे २६ लाख लोकसंख्या असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात पोलिस दलता मनुष्यबळ उपलब्ध करणे गरजेचे आहे.