लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर : तालुक्यातील अंबाबरवा अभयारण्यात वाघ आणि दीड वर्षीय बछड्यामध्ये लढाई झाली. यामध्ये दीड वर्षीय वाघिणीचा बछडा या लढाईमध्ये (झुंजीमध्ये) मृत्यूमुखी पडला. ही घटना १६ जुलै रोजी उघडकीस आली असून, या बछड्याचे १७ जुलै रोजी शवविच्छेदन करण्यात आले. अंबाबरवा अभयारण्यातील पळसखुंडी गावाजवळील उत्तरेस एका वाघाची व वाघीणीच्या बछड्याची झुंज झाली. या झुंजीमध्ये दीड ते दोन वर्षीय वाघीणीचा मृत्यू झाल्याने गस्तीवर असलेल्या वनसंरक्षकांच्या लक्षात आला. या घटनेची माहिती वनसंरक्षकांनी उपवनरक्षक वन्यजिव विभाग आकोट, बुलडाणा जिल्हा वॉर्डन मंजितसिंग, सोनाळा वनपरिक्षेत्र अधिकारी काझी यांना दिली. त्यानंतर घटनास्थळी वन्यजीव विभागाचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले. वाघ आणि बछड्यामध्ये झुंज झालेल्या या घटनास्थळाचा पंचनामा करुन मृत बछड्याचे १७ जुलै रोजी शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर वाघाच्या मृत दीड वर्षीय बछड्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.
वाघाच्या दीड वर्षीय बछड्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 12:40 AM