चिखली : मतदार संघात अनेक गावांतील ग्रामपंचायतींना कार्यलय उपलब्ध नसल्याने त्यांचा कारभार खाजगी जागेतून चालत होता. ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध नसल्याने ग्रामपंचायतींना कार्यलय बांधने आवघड ठरत होते. परिणामी गावातील नागरीकांनाही विविध समस्यांचा सामना करावा लागत होता. नेमकी ही बाब हेरून आमदार राहुल बोंद्रे यांनी राजीव गांधी सशक्तीकरण योजने अंतर्गत चिखली विधानसभा मतदार संघातील ग्रामपंचायत भवनासाठी निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी ग्रामविकास राज्यमंत्री महाराष्ट्र शासन यांचेकडे रेटून धरली होती. परिणामी शासनाने सन २0१३-१४ या वित्तीय वर्षासाठी पावसाळी आधिवेशनात ग्रामपंचायत भवन बांधणीसाठी मंजूर केलेल्या निधीपैकी १ कोटी रूपयांचा निधी मतदार संघातील दहा गावांसाठी उपलब्ध करून दिला आहे. चिखली विधानसभा मतदार संघात ग्रामपंचायत भवन बांधण्यासाठी हारणी, तेल्हारा, मोहदरी, धोडप, करतवाडी, अंचरवाडी, डासाळा, भोरसा भोरसी, आंधई आणि चंदनपुर या गावांना प्रत्येकी १0 लक्ष रूपये निधी उपलब्ध होणार आहे. सदर निधी मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.बुलडाणा यांना वितरीत करण्यासाठी आणि संबंधीत पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांचेकडे सुपूर्त करण्यासाठी आदेश निर्गमीत झाले आहे. आमदार राहुल बोंद्रे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मंजुर झालेल्या निधीतून वरील दहा गावात नविन ग्रामपंचायत भवन आकार घेणार असून त्याव्दारे त्या त्या गावातील नागरीकांच्या समस्या एकाच छताखाली सुटण्यास मदत होणार आहे..
दहा ग्रामपंचायतींच्या इमारतीसाठी एक कोटी
By admin | Published: July 10, 2014 11:25 PM