सर्वप्रथम महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपोषणाला सुरवात करण्यात आली. काळ्या कृषी कायद्यांविरोधात देशातील शेतकरी दिल्लीच्या सीमांवर मागील १०० दिवसांपापेक्षा जास्त दिवस ठाण मांडून बसले आहेत. काँग्रेस सरकारांनी उभारलेले सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग विकण्याचा सपाटा केंद्र सरकारने लावला आहे. यासोबतच पेट्रोल, डिझेलवर मोठ्या प्रमाणात कर लावून जनतेची लूट सुरु आहे. स्वयंपाकाच्या गॅसचे दर प्रचंड प्रमाणात वाढवल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. कोरोना संकटाच्या काळात लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अनेकांना मोठ्या वेतनकपातीचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे केंद्र सरकारने इंधनावरील अन्यायी करवाढ मागे घ्यावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन काँग्रेसच्यावतीने देण्यात आले. यावेळी भा. ई. नगराळे, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष माजी आ. राहुल बोंद्रे, हर्षवर्धन सपकाळ, जिल्हा परिषद अध्यक्षा मनिषा पवार, महिला व बालकल्याण सभापती ज्योतीताई पडघान, सभापती उषाताई चाटे, ज्ञानेश्वर सुरोशे, प्रकाश पाटील, समाधान सुपेकर, शेतकरी संघटनांचे संतोष परिहार, सतीश महेंद्रे, सुनील सपकाळ, रिजवान सौदागर, चाॅद मुजावर, श्लोकानंद डांगे, शेषराव पाटील सावळे आदी उपस्थित होते. या उपोषणाला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला जिल्हा अध्यक्ष अनुजाताई सावळे, नरेश शेळके, संतोष परिहार, सुमित सरदार, समाधान सावळे आदींनी भेट दिली. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनावर बाळाभाऊ भोंडे, ॲड राज शेख, सुनिल तायडे, नंदु शिंदे, दत्ता काकस, अशोकराव पडघान, समाधान सावळे, डाॅ संत्येंद्र भुसारी, संजय पांढरे, दीपक खरात, गणेश पाटील, अरविंद देशमुख, किशोर साखरे, नीलेश पाउलझगरे, डाॅ. अमोल लहाने, मधुकर पालकर, बाळु साळोख, कैलास जंगले, गोपाल औतकर, नितीन गायकवाड, नितीन हिवाळे, सुभाष जाधव, संजय टेकाळे, सोमप्रकाश डोमळे, मोती लवंगे, तेजराव सावळे, तेजराव जाधव, अमिन टेलर, हरिदास पठ्ठे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
जिल्हा काँग्रेसच्यावतीने एकदिवसीय उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 4:36 AM