बुलडाणा : केरळ पुरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सर्वच स्तरातून सुरू आहे. दरम्यान, जिल्ह्यातील गट सचिवांनी सुद्धा एक दिवसाचे वेतन केरळ पुरग्रस्तांसाठी देऊन एक आदर्श निर्माण केला आहे. जिल्ह्यातील गट सचिवांकडून ६५ हजार ३७४ रुपयांच्या रकमेचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठी जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जी. पी. साबळे, सहाय्यक निबंधक अे. बी. सांगळे, बुलडाणा जिल्हा गटसचिव संघटनेचे अध्यक्ष शिवाजी मेरत उपस्थित होते.
केरळ पुरग्रस्तांना गट सचिवांचे वतीने एक दिवसाचे वेतन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 17:57 IST