लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : जिल्ह्यात शनिवारी ५५९ जणांचे अहवाल तपासण्यात आले. त्यात ५५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर ५०४ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. दरम्यान, बुलडाणा येथील कोवीड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या चिखली तालुक्यातील शेलूद येथील एकाचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत मृत्यू पावलेल्यांची एकूण संख्या १२६ झाली आहे. दुसरीकडे जिलह्यातील एकूण बाधीत रुग्णांची संख्या ही ९,४२४ झाली असून त्यातील ५४१ जणांवर सध्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा येथील चार, गोंधनखेड येथील एक, देऊळगाव राजा येथील पाच, धोत्रा येथील एक, मेहुणा राजा येथील दोन, तुळजापूर येथील एक, नांदुरा येथील चार, भोटा येथील तीन, वसाडी येथील एक, पिंपळनेर येथील एक, लोणार दोन, पिंपळगाव उंडा येथील दोन, गजरखेड येथील एक, किनगाव राजा येथील दोन, धानोरी दोन, खामगाव तीन, पिंपळगाव राजा एक, भालेगाव एक, निमकवळा एक, घाटपुरी एक, उमरी अटाळी एक, मलकापूर सहा, वरखेड एक, आडविहीर येथील पाच या प्रमाणे ५५ कोरोना बाधीतांचा समावेश आहे. दरम्यान, चिखली तालुक्यातील शेलूद येथील एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.दरम्यान, शनिवारी १४७ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली. यामध्ये मोताळा कोवीड सेंटरमधून एक, मेहकर २१, मलकापूर ११, खामगाव सहा, चिखली १६, देऊळगाव राजा १७, बुलडाणा ३२, शेगाव १४, नांदुरा १३, जळगाव जामोद सहा, लोणार दोन, सिंदखेड राजा आठ या प्रमाणे कोरोना मुक्त झालेल्यांना सुटी देण्यात आली. दरम्यान, सध्या जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. सोबतच कोरोनाच्या चाचण्यांचाही वेग वाढविण्यात आला आहे. तसेच आरोग्य क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येत आहे.
बुलडाणा जिल्ह्यात एकाचा मृत्यू, ५५ जण कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2020 11:26 AM