पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा तालुक्यात ८, खामगाव ३, शेगाव ३, देऊळगाव राजा ६, चिखली ३, मेहकर ५, मलकापूर १, नांदुरा २, लोणार १, मोताळा ३, जळगाव जामोद २, सिंदखेड राजा ४ आणि संग्रामपूर तालुक्यात एकजण कोरोनाबाधित आढळून आला. उपचारादरम्यान चिखली येथील ८० वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गुरुवारी ३३९ बाधितांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत ८४ हजार ७१९ बाधितांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्यांपैकी ५ लाख १८ हजार ३८३ संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दुसरीकडे गुरुवारी १ हजार २९४ संदिग्धांचे अहवाल तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.
--४६६ सक्रिय रुग्ण--
जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ८५ हजार ८२५ झाली आहे. त्यापैकी ४६६ सक्रिय रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे ६४० जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांनी दिली.