खामगाव : वेगवेगळ्या तीन अपघातात १ जण ठार, तर ९ जण जखमी झाले. या घटना १८ व १९ एप्रिल रोजी घडल्या. मेहकर-जानेफळ रोडवरील फर्दापूरनजीक एका अज्ञात वाहनाने दुचाकीला जब्बर धडक दिली. त्यामध्ये दुचाकीस्वार जागेवर ठार झाल्याची घटना १८ एप्रिल रोजी रात्री ८.३0 वाजता घडली. खामगाव येथील उमेश विष्णूसिंग फुलारे (२८) हे एम.एच.२८ ई. २३९४ क्रमांकाच्या मोटारसायकलने जानेफळवरून मेहकरकडे येत होते. दरम्यान, फर्दापूरनजीक एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. त्यामध्ये दुचाकीस्वार उमेश फुलारे हे जागेवरच ठार झाले. याप्रकरणी मेहकर पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध कलम २७९, ३0४ (अ) भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच दुसर्या घटनेत भरधाव ट्रक मॅजिकला धडक देऊन उलटला. यामध्ये मॅजिकचा चालक जखमी झाला. ही घटना १९ एप्रिल रोजी खामगाव ते नांदुरा या राष्ट्रीय महामार्गावर खामगावनजीक घडली. चिंचखेड नाथ ता. खामगाव येथील मजूर पिंप्री देशमुख परिसरातील मुकुंद यांच्या खदानवर कामाला आहेत. या मजुरांना चिंचखेड नाथ येथील मॅजिक वाहनचालक आपल्या वाहन क्रमांक एम.एच.२८ व्ही ६१७८ ने सोडून चिंचखेड नाथ येथे परत जात होता. दरम्यान, समोरून भरधाव येणार्या हैद्राबाद येथून दिल्ली येथे मोसंबी घेऊन जाणार्या ट्रक क्रमांक एचआर ५५ के २६३५ च्या चालकाने मॅजीक वाहनाला धडक दिली. यामध्ये मॅजिक चालक दिलीप धोती रा. चिंचखेड नाथ हा गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जलंब पो.स्टे.चे पोहेकाँ शाम पवार, पोकाँ संतोष डाकोर, उमेश सिरसाट आदींनी त्वरित घटनास्थळ गाठून जखमीला उपचारासाठी खामगाव येथील रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी खामगाव शहर पोलिसांनी शून्य क्रमांकाने गुन्हय़ाची नोंद करून जलंब पो.स्टे.ला गुन्हा वर्ग करण्यात आला आहे.
अपघातात एक ठार,९ जखमी
By admin | Published: April 20, 2015 1:58 AM