शेख अफसर शेख अनफ (रा. लोणार गल्ली, देऊळगाव राजा) असे ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
चिखली आगार विभागात एसटी चालक असलेले शेख अफसर शेख अनफ दुचाकी क्रमांक एमएच २८ एल ५४११ ने चिखलीवरून देऊळगावराजाकडे जात असताना जालना येथून मलकापूरकडे माचिसचा माल घेवून जाणाऱ्या आयशर क्रमांक क्रमांक एमएच २१ - ८६३३ ने शे.अफसर यांना जबर धडक दिली. यामध्ये शेख अफसर यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी अंढेरा पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपास सुरू केला आहे. देऊळगावराजा ते चिखली रस्त्यावर दिवसाआड अपघाताची मालिका गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. अंचरवाडी फाट्याजवळ रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या अपूर्ण आहे. त्यामुळे या फाट्यालगत रोडवरून जाणारी वाहतूक नेहमी जीवघेणी ठरत आहे. येथील एकेरी वाहतुकीमुळेच हा बळी गेला असल्याचे बोलल्या जात आहे.