लोकमत न्यूज नेटवर्कअमडापूर: येथून जवळच असलेल्या चिखली रोड पेठ गावाजवळ काही व्यक्ती गांजा आणून विक्री करीत असल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारावर ठाणेदार विक्रांत पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी छापा मारून पेठनजीक ३0 किलो गांजा जप्त केला. एसडीपीओ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पाच नोव्हेंबरला रात्री करण्यात आली.याबाबत ठाणेदार विक्रांत पाटील यांनी माहिती दिली की, ५ नोव्हेंबर रोजी गुप्त माहिती मिळाल्यावरून अनिल जाधव, शाकीर पटेल, अशोक बोरकर, संजय नागवे यांच्यासह आम्ही पेठजवळील ज्ञानेश्वर विद्यालयानजीक चिखली रस्त्याच्या कडेला गेलो होतो. तेथे गवतात दोन गोण्यांमध्ये गांजा लपविलेला असल्याचे दिसून आले. ३0 किलो १५0 ग्रॅम या गांजाचे वजन असून, बाजारात त्याची किंमत १ लाख ५ हजार रुपये आहे.घटनास्थळाकडे जात असताना आरोपींना चाहूल लागल्याने त्यांनी त्यांच्या ताब्यातील गांज्याच्या गोण्या तेथेच फेकून पळ काढला. अंधाराचा फयदा घेत हे आरोपी घटनास्थळावरून पलयान करण्यात यशस्वी झाले.या प्रकरणी अमडापूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात कलम २0, २२, ३0 नुसार गुंगीकारक औषध द्रव्य व मनोव्यापावर परिणाम करणार्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास ठाणेदार विक्रांत पाटील करीत आहे.
अमडापुरात एक लाखाचा गांजा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2017 1:13 AM
अमडापूर: येथून जवळच असलेल्या चिखली रोड पेठ गावाजवळ काही व्यक्ती गांजा आणून विक्री करीत असल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारावर ठाणेदार विक्रांत पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी छापा मारून पेठनजीक ३0 किलो गांजा जप्त केला. एसडीपीओ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पाच नोव्हेंबरला रात्री करण्यात आली.
ठळक मुद्दे पेठ गावाजवळ काही व्यक्ती गांजा आणून विक्री करीत असल्याच्या गोपनीय माहितीमाहितीच्या आधारावर जप्त केला ३0 किलो गांजा