मेहकर (जि. बुलडाणा) : तालुक्यातील उकळी येथे जागेच्या कारणावरून वाद होऊन एकाचा खून झाल्याची घटना ३ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी मेहकर पोलिसांनी दोन आरोपींना ४ एप्रिल रोजी सकाळी ३ वाजताच्या सुमारास अटक केली आहे. उकळी येथे ज्ञानबा दगडू नवले व लक्ष्मण पांडुरंग काकडे हे शेजारी शेजारी राहतात. त्यांच्यामध्ये जागेच्या कारणावरून वाद आहे. दरम्यान, ३ एप्रिलच्या सायंकाळी लक्ष्मण पांडुरंग काकडे व विनोद लक्ष्मण काकडे यांनी संगनमत करून दामोधर दगडू नवले व ज्ञानबा दगडू नवले यांना मारहाण केली. दामोधर दगडू नवले यांच्या छातीवर लाथ मारल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर ज्ञानबा दगडू नवले यांना काचेची शिशी फोडून मारल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. यासंदर्भात ज्ञानबा दगडू नवले यांनी मेहकर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी लक्ष्मण पांडुरंग काकडे व विनोद लक्ष्मण काकडे यांना अटक करून कलम ३0२, ३0७, ३२३, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मेहकर पोलीस करीत आहेत.
जागेच्या वादातून एकाचा खून
By admin | Published: April 05, 2016 1:45 AM