मोताळा : ग्रामपंचायत कार्यालयात कर्तव्यावर असलेल्या ग्रामसेवकास एकाने शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला. ही घटना तालुक्यातील वडगाव खंडोपंत येथे २२ जानेवारी रोजी सकाळी १0.३0 वाजता घडली. मोताळय़ापासून ५ कि. मी. अंतरावर वडगाव खंडोपंत ग्रामपंचायतचे ग्रामसेवक रवींद्र राठोड हे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कर्तव्यावर होते. वडगाव येथीलच भागवत तोताराम हिवाळे (वय ३५) हे सकाळी १0.३0 वाजेच्या सुमारास तिथे आले. त्यांनी ग्रामसेवक राठोड यांना घरकुलाचे काम झाले का, असे विचारले. ग्रामसेवक राठोड यांनी तुमचे नाव यादीत नाही, असे समजावून सांगितले असता, भागवत हिवाळे यांनी राठोड यांना ईल भाषेत शिवीगाळ करून लोटपाट केली व कार्यालयातील रजिस्टर फाडून जीवे मारण्याची धमकी देत सरकारी कामात अडथळा आणला. या प्रकरणी ग्रामसेवक रवींद्र राठोड यांच्या फिर्यादीवरून भागवत हिवाळे यांच्याविरूद्ध शुक्रवारी बोराखेडी ठाण्यात कलम ३५३, १८६, ५0४, ५0६ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरकारी कामात अडथळा आणल्याने एकावर गुन्हा
By admin | Published: January 23, 2016 2:08 AM