शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

खासगी बस-ट्रकच्या धडकेत एक जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 4:45 PM

कारंजा लाड (वाशिम) : खासगी  ट्रॅव्हल्स व ट्रकची समोरासमोर धडक होऊन त्यात एक जण ठार तर चार जण जखमी झाल्याची घटना औरंगाबाद ते नागपूर द्रूुतगती मार्गावरील वाई फाट्यानजीक ३ डिसेंबरच्या रात्री ११.३० वाजताच्या दरम्यान घडली. 

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड (वाशिम) : खासगी  ट्रॅव्हल्स व ट्रकची समोरासमोर धडक होऊन त्यात एक जण ठार तर चार जण जखमी झाल्याची घटना औरंगाबाद ते नागपूर द्रूुतगती मार्गावरील वाई फाट्यानजीक ३ डिसेंबरच्या रात्री ११.३० वाजताच्या दरम्यान घडली. प्राप्त माहितीनुसार एम. एच. २९ टी ०७३६ क्रमांकाचा ट्रक शेलुबाजारकडून कारंजाकडे येत असतांना विरूध्द दिशेने येणाºया एम. एच.४० ए.टी.९३५ या सैनी ट्रॅव्हल्स व ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात ट्रकचालक विलास सवाई चव्हाण (३६) रा. वाइलिंगी ता. दिग्रस जि. यवतमाळ हे जागीच ठार झाले. तर राजेश अलधरे (४०) रा. नागपूर, राहूल रमेश देवलकार (२२) रा. छिंदवाडा (मध्यप्रदेश), दिपक साहो (२६) रा. नागपूर व शिशिर वसंत कुळकर्णी (३०) रा जुने शहर अकोला हे जखमी झाले. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याचे बोलल्या जाते. या अपघातानंतर खासगी ट्रव्हल्सचे दार बंद झाल्याने प्रवाशांच्या मनात भिती निर्माण झाली होती. अखेर प्रवाशी खिडकीचे काच फोडून बाहेर पडले. जखमींना दिपक वाघमारे, सुमीत बागडे व बंडु चतुरकार यांनी रूग्णवाहिकेने उपचाराकरिता कारंजा उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. दरम्यान कारंजा ग्रामीण पोलिसांनी घटनेची नोंद केली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजाAccidentअपघात