खामगाव: राज्य परिवहन महामंडळाने तिकिटाच्या किमतीवर एक रुपया अधिभार लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे १ एप्रिलपासून प्रवाशांना एसटीच्या तिकीट भाडेवाढीला सामोरे जावे लागणार आहे. यापूर्वी दिवाळीमध्ये प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन एसटीला होणारा तोटा भरून काढण्यासाठी २0 दिवसांकरिता हंगामी भाडेवाढ केली होती. ही भाडेवाढ ५ ते २५ नोव्हेंबरपर्यंत होती. एसटीला अपघात होऊन प्रवासी मरण पावल्यास, मृत प्रवाशाच्या कुटुंबीयांना राज्य परिवहन महामंडळाकडून तीन लाख रुपये तसेच जखमी प्रवाशाला ४0 हजार ते ७५ हजार रुपयांपयर्ंत नुकसानभरपाई दिली जाते. ही रक्कम वाढत्या महागाईच्या काळात अत्यंत तोकडी असल्यामुळे त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. त्यानुसार मृत प्रवाशाच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपये देण्यात येणार आहेत. याशिवाय जखमींना देण्यात येणार्या मदतनिधीतही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तथापि, संबंधित वाढीव निधी देण्यासाठी पैसा कोठून आणायचा, असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर महामंडळाने प्रवासी तिकीटदरावरच एक रुपयाचा अधिभार लावण्याचा निर्णय घेऊन प्रवाशांच्याच खिशावर डल्ला मारला आहे. या भाडेवाढीची अंमलबजावणी १ एप्रिलपासून लागू करण्यात आली आहे.
एसटी बसच्या तिकिटावर एक रुपया अधिभार
By admin | Published: April 02, 2016 12:51 AM