लोकमत न्यूज नेटवर्कचिखली: छत्रछाया हय़ुमन डेव्हलपमेंट फाउंडेशनद्वारा संचालित नंदनवन परिवारच्या मदतीसाठी एक चहा देशासाठी, अनाथांच्या भल्यासाठी अभिनव उपक्रम ९ ते १५ ऑगस्टदरम्यान राबवून नागरिकांकडून आर्थिक मदत मिळविण्यासाठी सुरू करण्यात आला आहे.नंदनवन परिवार हा साखळी बु. जिल्हा बुलडाणा येथील विक्रम दरा खे यांच्या शेतात सुरू करण्यात आला असून, याद्वारे अनाथ, निराधार गरजू व होतकरू मुले, आत्महत्या केलेल्या शेतकर्यांची मुले, अ पघाताने निराo्रित झालेली मुले व भीक मागणारी अनाथ मुलांच्या अन्न, वस्त्र निवारा आरोग्य, संरक्षण, नोकरी व व्यवसायाच्या माध्यमा तून स्वावलंबी बनविणे यासाठी कार्यरत आहे. या उपक्रमासाठी समाजातील सहृदय व दानशूर व्यक्तींकडून आर्थिक सहाय्य मिळविण्यासाठी ‘एक चहा देशासाठी, अनाथांच्या भल्यासाठी’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये नागरिकांना एक कप चहा देऊन उपक्रमाची माहिती देण्यात येते व दानशूर व्यक्तीकडून आर्थिक सहाय्य मिळविण्यात येते. या उपक्रमास प्राचार्य नीलेश गावंडे, सुनील मोडेकर, श्वेता महाले, विजयकुमार कोठारी, शरदसेठ भाला, डॉ. सत्येंद्र भुसारी, विष्णू कुळसुंदर, शैलेश बाहेती व तहसील कर्मचारी व विविध मान्यवरांनी भेट देऊन भरीव आर्थिक सहाय्य केले आहे. -
‘एक चहा देशासाठी, अनाथांच्या भल्यासाठी!’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 11:32 PM
चिखली: छत्रछाया हय़ुमन डेव्हलपमेंट फाउंडेशनद्वारा संचालित नंदनवन परिवारच्या मदतीसाठी एक चहा देशासाठी, अनाथांच्या भल्यासाठी अभिनव उपक्रम ९ ते १५ ऑगस्टदरम्यान राबवून नागरिकांकडून आर्थिक मदत मिळविण्यासाठी सुरू करण्यात आला आहे.
ठळक मुद्देछत्रछाया हय़ुमन डेव्हलपमेंट फाउंडेशनचा अभिनव उपक्रम अनाथ मुलांना देणार अन्न, वस्त्र निवारा व आरोग्य सुविधा