लाभार्थ्यांच्या बँक खात्यात टाकले जाणार आहेत. त्यासाठी मुलांचे बँक खाते काढण्याकरिता एक हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागत आहे.
पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मिळणार - १५६ रुपये
सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मिळणार - २३४ रुपये
जिल्ह्यातील पात्र लाभार्थी
पहिली ते आठवी विद्यार्थी: २६८१९४
शाळा: १९९८
बँकेत खाते उघडण्यासाठी लागणार हजार रुपये
प्रतिविद्यार्थी दरमहा दीडशे ते अडीचशे रुपयांपर्यंत उन्हाळी सुटीतील आहाराचे पैसे मिळणार आहेत. मात्र यंदा शाळा
ऑनलाईन भरणार असल्यामुळे २०२१-२०२२ या शैक्षणिक सत्रातील आहाराऐवजी धान्य मिळणार की डीबीटीद्वारे पैसेच मिळणार, याबाबत संभ्रम कायम आहे. पोषण आहारासाठी पात्र विद्यार्थ्यांच्या बँक खात्याची अद्ययावत
माहिती तयार ठेवण्याचे नियोजन सुरू आहे. ज्यांचे बँक खाते अद्याप उघडले गेले नाही, अशा विद्यार्थ्यांचे खाते
उघडण्यासाठी शाळांनी सहकार्य करावे, असे आदेश देण्यात आले आहेत.
शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत उन्हाळी सुट्टीच्या कालावधीतील लाभ थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्याचे नियोजन सुरू आहे.
सचिन जगताप, प्राथमिक शिक्षणाधिकारी, बुलडाणा.
पालकांची डोकेदुखी वाढली
उन्हाळी सुट्टीतील शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वितरित न करता ते अनुदान बँक खात्यात जमा करण्याचा शासनाचा निर्यय पालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. आता विद्यार्थ्यांचे बँक खाते काढावे लागत आहे. सध्या बँकेत पीक कर्जाची गर्दी आहे. त्या विद्यार्थ्याचे बँक खाते काढण्यासाठी पालक गेल्यानंतर त्यांना परत जावे लागत आहे.