मोताळा : गणेश उत्सवाच्या माध्यमातून गावागावांत होणार्या विघटनाच्या राजकारणाला मात देण्यासाठी तालुक्यातील २0 गावांनी ह्यएक गाव-एक गणपतीह्ण ही संकल्पना राबवून गणेश उत्सव साजरा करण्याचा संकल्प केला आहे. मागील वर्षी ही संकल्पना १८ गावात राबवल्या गेली होती. या उपक्रमामुळे गावागावांत शांतता प्रस्थापित होऊन सलोख्याचे वातावरण निर्माण होण्यास निश्चितच मदत मिळत आहे.शासनाने २00७ पासून तंटामुक्त गाव मोहिमेला सुरूवात केलेली आहे. गणेश उत्सावादरम्यान गाव विकासाचा मूळ हेतू बाजूला राहून गटातटाच्या राजकारणाला उधाण येत असल्यामुळे गावगावांतील सलोखा व एकोपा नाहीसा होत असे. यामुळे गणेश उत्सवाला अनेक ठिकाणी गालबोट लागले होते. उत्सवादरम्यान तंट्याचे प्रमाणही वाढल्यामुळे गावकरी मंडळीकडून एकतेचा वारसा जपण्यासाठी एक गाव-एक गणपती ही संकल्पना पुढे आली. या संकल्पनेमुळे गावातील नागरिकांचे ङ्म्रम वाचवून आर्थिक नुकसानही टाळता येते. संपूर्ण गाव एकाच गणपती मंडळाच्या अधिपत्याखाली येत असल्याने सर्वधर्म समभवाची भावना वाढीस लागण्यास मदत होणार आहे. या पार्श्वभूमीवर या वर्षी तालुक्यात ह्यएक गाव-एक गणपतीह्ण या संकल्पनेला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे धामणगाव बढे पोलिस स्टेशनअंतर्गत ९ गावांमध्ये ह्यएक गाव-एक गणपतीह्ण तर रोहिणखेड मध्ये ४ गणेश मंडळे स्थापन झाली आहे. बोराखेडी पोलिस स्टेशन अंतर्गत ११ गावांमध्ये ह्यएक गाव-एक गणपतीह्ण उत्सव साजरा होणार आहे, तर उर्वरीत तीन गावांमध्ये दोन-दोन गणेश मंडळे आहेत. यामध्ये मोताळा शहर १ व ग्रामीण भागातील १६ गणेश मंडळाचा समावेश आहे. तालुक्यातील धामणगाव बढे व बोराखेडी ही दोन्ही पोस्टे तंटामुक्ती मोहिमेमध्ये अग्रेसर आहेत.
२0 गावांत एक गाव-एक गणपती
By admin | Published: September 03, 2014 11:18 PM