शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

बँक खात्यावर आॅनलाइन दरोडा; १ लाख ३२ हजार रुपये काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2019 3:00 PM

बिबी: भारतीय स्टेट बँकेच्या बिबी येथील शाखेतील ग्राहकांच्या खात्यातून १ लाख ३१ हजार ५०० रुपयांची रक्कम परस्पर इतर खात्यावर वळवून काढून घेतल्याची घटना ५ व ६ मे च्या मध्यरात्री दरम्यान घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कबिबी: भारतीय स्टेट बँकेच्या बिबी येथील शाखेतील ग्राहकांच्या खात्यातून १ लाख ३१ हजार ५०० रुपयांची रक्कम परस्पर इतर खात्यावर वळवून काढून घेतल्याची घटना ५ व ६ मे च्या मध्यरात्री दरम्यान घडली. बँक खात्यावर पडलेल्या या आॅनलाइन दरोड्यामुळे ग्राहकांमध्ये खळबळ उडाली आहे.भारतीय स्टेट बँक आॅफ इंडिया कडे राष्ट्रीयीकृत बँक असल्यामुळे ग्राहक विश्वासाने आपले खाते या बँकेत काढतात. त्यामुळे आपल्या जवळील कोट्यवधीच्या रक्कमा सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून बँकेत ठेवतात. आवश्यक वेळी ते आपल्या खात्यातून देवाण-घेवाणीचा व्यवहार करतात. परंतु या आॅनलाइन व्यवहारामुळे जनतेच्या घामाच्या पैशावरच आता हॅकर आॅनलाइन दरोडे घालत आहेत. बिबी येथील स्टेट बँक शाखेच्या तीन खातेदारांच्या खात्यातून परस्पर रक्कम काढून ग्राहकांना लाखो रुपयांचा चुना लावण्याचे काम हॅकर्सनी केले आहे. यासंदर्भात ग्राहकांनी बँकेचे व्यवस्थापक ब्रिजेशकुमार मदन मोहन यांच्याकडे तक्रार केली असून, आॅनलाइन तक्रारसुद्धा करण्यात आली आहे. तसेच बिबी पोलीस स्टेशन येथे सुद्धा तक्रार नोंदविण्यात आली आहे. त्यात त्यांनी हॅकर्सवर योग्य ती कारवाई करून आमची रक्कम परत मिळवून देण्याची मागणी केली आहे. बीबी येथील सुनंदा सिताराम साळवे व्यवसायने शिक्षिका असून त्यांच्या खात्यातून ५ मे रोजी रात्री ११.५५ वाजता २० हजार रुपये, ११.५७ वाजता ४० हजार रुपये ६ मे रोजी रात्री १२.०१ वाजता ४० हजार रुपये व १२.०३ वाजता २० हजार रुपये असे चार वेळा एटीएमद्वारे परस्पर एक लाख २० हजार रुपये काढण्यात आले आहे. तसेच वैभव श्रीधर आटोळे यांच्या खात्यातून ५ मेच्या रात्री ८.१६ वाजता दहा हजार रुपये व ८.१७ वाजता १ हजार ५०० रुपये असे दोन वेळा ११ हजार ५०० रुपये काढण्यात आले आहेत. खापरखेडा येथील घुले यांच्या खात्यातून सुद्धा १ हजार २०० रुपये काढण्यात आलेले आहेत. या घटनेमुळे ग्राहकांमध्ये अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून एकच खळबळ उडाली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाState Bank of Indiaस्टेट बँक आॅफ इंडियाonlineऑनलाइन