शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राजकीय घडामोडींना वेग !महायुतीतील बड्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार;शिंदे दिल्लीला जाणार
2
पाकिस्तानात जोरदार संघर्ष, ७ दिवसांत १०० मृत्यू; कुर्रम जिल्ह्यात हिंसाचार पेटला
3
महाराष्ट्रात धक्कातंत्र? मुख्यमंत्री भाजपचाच होणार, पण नक्की कोणाला संधी?; पक्षातील ५ नावं स्पर्धेत
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
5
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
6
Stock Market Updates: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये तेजी; ऑटो शेअर्सवर दबाव
7
महायुतीच्या नव्या सरकारमध्ये गृहमंत्री कोण असेल? अजित पवार, एकनाथ शिंदे की....  
8
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
9
देशातील नंबर १ रेस्तराँ कोणतं? Anand  Mahindra यांचीही आहे गुंतवणूक; या यादीत घातलाय धुमाकूळ
10
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
11
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
12
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
13
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
14
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
15
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
16
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
17
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
18
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
19
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
20
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

नेत्यांची ऑनलाईन हायटेक इमेज बिल्डिंग

By admin | Published: September 03, 2014 10:23 PM

विधानसभेच्या रणधुमाळीत बुलडाणा जिल्ह्यात ‘ऑनलाईन’ प्रचार.

बुलडाणा: लोकसभा निवडणुकांमध्ये सोशल नेटवर्किंगचा झालेला फायदा लक्षात घेता विधानसभेच्या रणधुमाळीतदेखील ऑनलाईन प्रचारास सुरुवात झाली आहे. अद्याप निवडणुकांच्या तारखा, पक्षांच्या याद्या याबद्दल काहीच घोषणा झालेली नसली तरी  निवडणुकांचा फिव्हर जाणवायला लागला आहे. आचारसंहिता लागू होण्याअगोदरच जनतेच्या मनात चांगली प्रतिमा प्रस्थापित करण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून धडपड होताना दिसत आहे. अगदी मोठमोठय़ा नेत्यांपासून ते अगदी पहिल्यांदाच निवडणुका लढविण्याचे स्वप्न पाहणार्‍यांकडून सोशल नेटवर्किंगच्या मार्गातून ऑनलाईन इमेज बिल्डिंग साठी प्रयत्न होताना दिसत आहेत. निवडणुका म्हटल्या की डोळ्य़ासमोर येतात ते गल्लोगल्ली प्रचार करणारे कार्यकर्ते, जोरजोरात वाजणारे लाऊडस्पीकर्स अन् थेट जनसं पर्कावर असणारा जोर. परंतु बदलत्या काळासोबत निवडणूक प्रचाराचा ट्रेन्ड देखील बदलायला लागला आहे. नागपुरातदेखील ऑनलाईन कट्टय़ावरील जनसंपर्क सुरू झाला आहे. अनेक नेत्यांनी तर यासंदर्भात विशेष सेलदेखील स्थापन केला आहे.

*आयटीतील युवक झाले ई-कार्यकर्तेह्यआयटीह्ण क्षेत्रात काम करणार्‍या व निरनिराळ्य़ा पक्षांशी संबंधित असणार्‍या अनेक तरुणांनी तर स्वत: पुढाकार घेऊन ह्यऑनलाईनह्ण कट्टय़ांवर निरनिराळ्य़ा माध्यमांतून प्रचारासाठी जोर दिला आहे. हे तरुण एकत्रित येऊन काम करतात. कोणी फेसबुकचे ह्यपेजह्ण सांभाळत आहे तर कोणी विशेष संकेतस्थळ तयार केले आहेत. *युवावर्गावर भिस्तअद्याप विधानसभा निवडणुकांच्या तारखा घोषित झाल्या नसल्या तरी उमेदवारांनी मात्र जनसंपर्क वाढविण्यास सुरुवात केली आहे. यात विद्यमान उमेदवारांसोबतच इच्छुकांचादेखील मोठय़ा प्रमाणात भरणा आहे. येणार्‍या निवडणुकांत युवावर्गाला सर्वच पक्षांकडून महत्त्व देण्यात येत आहे. त्यामुळे त्यांना भावेल अशा माध्यमांतून जनसंपर्क करण्यावर भर देण्यात येत आहे. जनसंपर्क मोहीम तसेच निरनिराळ्य़ा सामाजिक माध्यमातून जनतेपर्यंत आ पली कामे व भूमिका पोहचविण्याची कसरत तर सुरू आहेच. परंतु अनेक उमेदवारांनी मतदारांना व विशेषत: युवावर्गाला प्रभावित करण्यासाठी थेट ह्यऑनलाईन कनेक्शनह्ण वर भर दिला आहे. ह्यफेसबुकह्ण, ह्यटष्‍द्वीटरह्ण, मोबाईलवरील ह्यव्हॉट्सअँपह्ण इत्यादींच्या माध्यमातून ते जनतेच्या संपर्कात राहत आहे त. अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या पदाधिकार्‍यांना नेहमी ऑनलाईन राहण्यासाठी स्मार्टफोन घेवून दिले आहेत. त्यामुळे काही कार्यकर्ते ऑनलाईन होण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे.

*सोशल कनेक्टची दिनचर्याफेसबुक, टष्‍द्वीटर इत्यादींचे अकांऊट नियमित तपासणे.दररोज सकाळी, सायंकाळी व रात्री नियमितपणे निरनिराळे अपडेट्स टाकणे.जास्तीत जास्त प्रमाणात मेंबर्स कसे होतील याकरिता प्रयत्न करणे.एखादी मोहीम, कार्य किंवा योजनेबद्दल माहिती टाकणे.पक्षासंदर्भातील सकारात्मक बाबी प्रकाशात आणणे.सोशल नेटवर्किंग साईट्सवर येणार्‍या कमेंट्स, सूचनांचे विश्लेषण करणे.दुसर्‍या पक्षांच्या ह्यऑनलाईनह्ण हालचालींवर लक्ष ठेवणे.*सखोल रिसर्चएकीकडे तरुणाईकडून उमेदवारांचा जनसंपर्क वाढविण्याचे प्रयत्न होत असतानाच दुसरीकडे त्यांचा सांख्यिकीदृष्ट्या अभ्यासदेखील सुरू आहे. म तदारांना नेमके काय अपेक्षित आहे, काम करण्यात कुठे अपयश आले आहे, कोणत्या भागात समस्या आहेत तसेच मतदानाचे प्रमाण कसे वाढेल इ त्यादी निरनिराळ्य़ा मुद्यांवर सोशल नेटवर्किंग साईट्सवर येणार्‍या जनतेच्या कमेंट्स, सूचना यांच्या आधारावर विश्लेषण केले जात आहे. विशेषत: पक्ष पातळीवर याला महत्त्व देण्यात येत आहे अशी माहिती एका प्रस्थापित पक्षाच्या पदाधिकार्‍याने दिली.