शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

गणेश मंडळांसमोर आॅनलाईनचे विघ्न; तांत्रिक अडचणींचा खोडा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2018 5:53 PM

बुलडाणा : सावर्जनीक गणेश मंडळांना यावर्षीपासून आॅनलाईन परवागनी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी १ सप्टेंबरपासून १० सप्टेंबरची मुदत देण्यात आली आहे. परंतू पहिल्याच दिवशी आॅनलाईन अर्जासाठी तांत्रिक अडचणींचा खोडा, परवानगीची नियमावली व कागदपत्रांची पुर्तता करताना गणेश उत्सव मंडळांसमोर अनेक विघ्न निर्माण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. 

ठळक मुद्देपोलिस विभागाच्या संकेतस्थळावर आॅनलाईन अर्ज भरून सादर करण्याची प्रक्रिया १ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आली.यात तांत्रिक अडचणींमुळे संकेतस्थळावर अनेक जण अर्ज करू शकले नाहीत. मात्र आॅनलाईन अर्ज स्वीकारण्यासाठी १० सप्टेंबरपर्यंतचीच मुदत देण्यात आलेली आहे.

- ब्रम्हानंद जाधवबुलडाणा : सावर्जनीक गणेश मंडळांना यावर्षीपासून आॅनलाईन परवागनी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी १ सप्टेंबरपासून १० सप्टेंबरची मुदत देण्यात आली आहे. परंतू पहिल्याच दिवशी आॅनलाईन अर्जासाठी तांत्रिक अडचणींचा खोडा, परवानगीची नियमावली व कागदपत्रांची पुर्तता करताना गणेश उत्सव मंडळांसमोर अनेक विघ्न निर्माण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. पोलिसांसह नगर पालिका व नगर पंचायत प्रशासनाकडे परवानग्यांकरिता  सार्वजनीक गणेश मंडळांची धावपळ होते. प्रशासन व मंडळाचे काम सोईस्कर करण्यासाठी यावर्षीपासून गणेश मंडळांच्या  परवानगीसाठी आॅनलाईनची सक्ती करण्यात आली आहे. गणेश उत्सव मंडळाचा परवाना मिळविण्यासाठी संगणक प्रणालीद्वारे पोलिस विभागाच्या संकेतस्थळावर आॅनलाईन अर्ज भरून सादर करण्याची प्रक्रिया १ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आली. संकेतस्थळावर लॉग ईन केल्यानंतर मंडळाच्या अध्यक्षाचे ईमेल आयडी, पासवर्ड व मोबाईल क्रमांक टाकून सर्व आवश्यक ती माहिती भरावी लागते. गणेश उत्सव स्थापना दिनांक व विसर्जन दिनांक, मिरवणूक मार्ग याबाबत बिनचुक माहिती भरणे आवश्यक आहे. त्यानंतर आॅनलाईन नोंदणी क्रमांक देण्यात येतो. परवानगीसाठी अर्ज करताना मागील वर्षी परवानगी घेतलेल्या गणेश उत्सव मंडळानी त्याचप्रमाणे नवीन परवागनी अर्ज करताना त्या क्षेत्रातील नगर पालिका किंवा ग्रामपंचायत कार्यालयाकडून गणेश उत्सव साजरा करण्यास अनुमती असल्याचे संमती पत्र देणे आवश्यक आहे. पहिल्याच दिवशी आॅनलाईन अर्ज भरताना अनेक अडचणी निर्माण झाल्याचे सार्जवनीक गणेश मंडळाकडून सांगण्यात आले. यात तांत्रिक अडचणींमुळे संकेतस्थळावर अनेक जण अर्ज करू शकले नाहीत. अर्जासाठी कागदपत्रांची जुळवाजुळवही मोठ्या प्रमाणावर करावी लागते, मात्र आॅनलाईन अर्ज स्वीकारण्यासाठी १० सप्टेंबरपर्यंतचीच मुदत देण्यात आलेली आहे. त्यानंतर अर्ज स्वीकारल्या जाणार नसल्याने गणेश मंडळासाठी आॅनलाईन प्रक्रिया अडचणीची ठरत आहे. 

कागदपत्रांच्या पुर्ततेसाठी कसरतसार्वजनीक गणेश मंडळांना परवागीसाठी आॅनलाईन अर्ज भरताना विविध प्रमाणपत्र जोडावे लागत आहेत. ज्या ठिकाणी गणेशाची स्थापना करायची त्या जागेचे नाहरकत प्रमाणपत्र, ग्रामपंचायत  किंवा नगर पालिका कार्यालय, पोलिस स्टेशन, धर्मदाय आयुक्त कार्यालयाचे नाहरकत प्रमाणपत्र जोडावे लागते. त्यानंतर गणेश मंडळाची कार्यकारनी यादी मोबाईल नंबरसह, अध्यक्षाचे आधारकार्ड, मागील वर्षाची परवागनी प्रत आवश्यक आहे. या प्रमाणपत्रांची पुर्तता करण्यात मंडळांची कसरत होत आहेत.  

वर्गनी गोळा करण्याच्या परवगीला ‘एरर’गणेशोत्सव मंडळांना उत्सवांसाठी वर्गणी, देणगी जमा करण्यासाठी सहायक धमार्दाय आयुक्तांची पुर्व परवानगी बंधकारक आहे. वर्गणी गोळा करण्याची परवागीसाठी सुद्धा आॅनलाईन प्रक्रियेचा वापर होतोय. मात्र चॅरीटी महाराष्ट्रच्या संकेतस्थळावर ‘एरर’ येत असल्याने गणेश मंडळाच्या पदाधिकाºयांना  अडचणी येत आहे.

 गणेश मंडळांना परवानगीसाठी आॅनलाईनच अर्ज करावे लागतील. त्यासाठी १० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली असून त्यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे प्रत्येक मंडळाने आॅनलाईन प्रणालीचा वापर करून अर्ज करावेत. - यु. के. जाधव,ठाणेदार, शहर पोलिस स्टेशन, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाGanesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८