चिखली : स्थानिक अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयात १२ एप्रिल रोजी डॉ. जि. के. आवारी, नागपूर यांच्या ' इम्पॅक्ट ऑफ नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ऑन टेक्निकल एज्युकेशन २०२० या विषयावर ऑनलाईन कार्यशाळा पार पडली.
''''राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०'''' मध्ये प्रत्येकाला शिक्षण व सातत्यपूर्ण शिक्षण यावर भर देण्यासह विद्यार्थ्यांचे मूल्यांकन व परीक्षा पध्दतीत आमूलाग्र बदल केले जाणार आहेत. यासह महाविद्यालयांना स्वायत्तता देणे, नामांकित विद्यापीठ व शैक्षणिक संस्था यांना विदेशात शाखा उघडण्यास परवानगी, त्याचप्रमाणे जगातील नामवंत पहिल्या १०० शैक्षणिक संस्थांना त्यांच्या शाखा भारतात उघडण्यास परवानगी देणे, आदी बाबींचा समावेश असल्याची माहिती देण्यासह इतर सर्व बाबींवर सखोल माहिती डॉ. आवारी यांनी या कार्यशाळेत दिली. प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण नन्हई यांनी केले. या कार्यशाळेला संस्थेचे विश्वस्त सिध्देश्वर वानेरे, अनुराधा फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. के. आर बियाणी, डॉ़. काळे, डॉ. पागोरे तसेच देशभरातील अभियांत्रिकी, फार्मसी व तंत्रनिकेतन संस्थांचे सुमारे २०० प्राचार्य, प्राध्यापकांनी ऑनलाईन पध्दतीने यात सहभाग नोंदविला. डॉ. आर. बी. मापारी यांनी आभार मानले.