महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व राष्ट्रीय छात्र सेना यांच्यातर्फे ऑनलाईन पद्धतीने योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी बालाजी महाराज संस्थान, देऊळगाव राजाचे वंशपारंपरिक विश्वस्त व महाविद्यालयाचे अध्यक्ष राजे विजयसिंह जाधव, डॉ. एस. डी. चव्हाण, महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी ऑनलाईन सहभागी झाले होते. योग शिबिरात महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. किरण मोगरकर यांनी मार्गदर्शन केले. योगसत्राची सुरुवात प्रार्थनेने करण्यात आली. त्यानंतर त्यांनी योग व प्राणायामाची प्रात्यक्षिके करून दाखविली. महाविद्यालयाचे अध्यक्ष राजे विजयसिंह जाधव यांनी मनोगत व्यक्त केलेे. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. बी. यू. काळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले; तर एन.सी.सी. केअर टेकर डॉ. एम. आर. तांदळे यांनी आभार मानले.
व्यंकटेश महाविद्यायालयामध्ये ऑनलाइन योग दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 4:23 AM