--शासनाचेही दुटप्पी धोरण--
बुलडाणा जिल्ह्यातील पीक विम्याच्या रकमेसंदर्भात गुरुवारी कृषिमंत्री दादा भुसे बैठक घेणार होते. मात्र, वेळेवर ही बैठक रद्द करण्यात आली. त्यामुळे पीक विम्यासंदर्भात शेतकऱ्यांमध्ये चुकीचा संदेश जात असल्याची ओरड होत आहे. प्रामुख्याने जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना २०२०-२१ या वर्षातील नुकसानभरपाई मिळालेली नाही. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून केवळ १७ कोटी रुपये नुकसानभरपाई म्हणून अदा करण्यात आले आहेत.
--हवामान बदलामुळे शेतीला फटका--
अलीकडील काळात अपघाव पद्धतीने पाऊस पडत आहे. पावसाचे दिवस कधी कमी होत आहेत, तर कधी परतीचा पाऊस अधिक होत आहे. दोन्ही स्थितीत शेतकरी भरडला जात आहे. त्यामुळे पीक विमा हा शेतकऱ्यांसाठी आश्वासक असला तरी शेतकऱ्याला अपेक्षित नुकसानभरपाई मिळत नसल्याची ओरड आहे. हवामान बदलासंदर्भात बुलडाणा जिल्हा संवेदशील आहे. त्याचे दृश्य परिणाम २०१४ पासून मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यात दिसत आहेत.
--पीक विम्याची स्थिती--
जिल्ह्यातील एकूण शेतकरी :- ५,८७,८४८
गतवर्षी विमा काढलेले शेतकरी :- २,९६,१५४ (५०.३७ टक्के)
यंदा विमा काढलेले शेतकरी :- २,२४,००० (३८ टक्के)
१५ जुलैनंतर विमा काढलेेले शेतकरी :- ८४,५९६ (१४ टक्के)