मेहकर : मेहकर उपविभाग विज वितरण कंपनीमध्ये गेल्या अनेक दिवसापासून विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. समस्या वेळेवर सुटत नसल्याने सर्वसामान्य माणूस हैराण झाले आहेत. परंतु मेहकर विज वितरण कंपनीच्या कार्यालयामध्ये विविध विभागात अनेक कर्मचाºयांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे इतर कर्मचाºयांवर कामाचा बोजा वाढत आहे. मेहकर तालुक्यात येणाºया जवळपास १४३ गावाचा कारभार केवळ ४९ कर्मचाºयांवर चालतो. कर्मचारी कमी असल्याने समस्या वाढत असून इतर कर्मचाºयांवर कामाचा ताणतणाव वाढत आहे.सध्या दैनंदिन जीवनामध्ये इतर जीवनावश्यक वस्तुबरोबर विज ही आवश्यक बाब होऊन बसली आहे. घरगुती कामापासून ते व्यवसाय, शेती इतर कामासाठी विज ही आवश्यक होऊन बसली आहे. शेतकºयांच्या कृषी पंपाची कामे वेळेवर होत नसल्याने याचा परिणाम पिकांच्या उत्पादनावर होत आहे. कृषी पंपाची विज वेळेवर मिळत नसल्याने पिकांना पाणी देता येत नाही. त्यामुळे पिकांच्या उत्पादनात दिवसेंदिवस घट होत चालली आहे. दरम्यान विज वितरण कंपनी कार्यालय मेहकर अंतर्गत जवळपास ९३ पदे मंजूर आहेत. परंतु प्रत्यक्षात मात्र केवळ ४९ कर्मचारीच कार्यरत आहेत. ४४ कर्मचारी हे रिक्त असल्याने इतर कर्मचाºयांवर कामाचा बोजा वाढत आहेत. काम जास्त अन् कर्मचारी कमी त्यामुळे शेतकºयांची व सर्वसामान्यांची विजेची कामे वेळेवर होत नाहीत. जनतेमध्ये विज कंपनी विरोधात रोष निर्माण होतांना दिसत असला तरीपण वरिष्ठ पातळीवरुन रिक्त जागा भरण्यास विलंब होत असल्याने विजेच्या समस्या निर्माण होत आहेत. कर्मचारी कमी असूनही इतर जे कार्यरत कर्मचारी आहेत. ते कर्मचारी आपल्यापरिने विज समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मेहकर भाग १ मध्ये ११ जागा मंजूर असून ५ कर्मचारी कार्यरत असून, ६ कर्मचारी रिक्त आहेत. मेहकर भाग - २ मध्ये १३ जागा मंजूर असून ९ कर्मचारी कार्यरत असून ४ जागा रिक्त आहेत. मेहकर भाग १ मध्ये १३ जागा मंजूर असून ११ कार्यरत असून २ जागा रिक्त आहेत. मेहकर भाग २ मध्ये ११ जागा मंजूर असून ४ कर्मचारी कार्यरत असून, ७ जागा रिक्त आहेत. डोणगाव भाग १ मध्ये १४ जागा मंजूर असून, ७ कर्मचारी कार्यरत असून ७ जागा रिक्त आहेत. डोणगाव भाग २ मध्ये १२ जागा मंजूर असून, ७ कर्मचारी कार्यरत असून, ५ जागा रिक्त आहेत. जानेफळ येथे १६ जागा मंजूर असून ६ कर्मचारी कार्यरत असून १० जागा रिक्त आहेत. यामध्ये जवळपास ९० जागा मंजुर असताना प्रत्यक्षात मात्र केवळ ४९ कर्मचारी कार्यरत आहेत. ४१ कर्मचारी सध्या रिक्त आहेत. त्यामुळे इतर कर्मचाºयांवर कामाचा बोजा वाढत असून, विजेच्या समस्या सुटण्यास विलंब होत आहे. त्यामुळे रिक्त असलेल्या जागा तात्काळ भरुन समस्या सोडवाव्यात, अशी मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)१ वर्षापासून शाखा अभियंताच नाहीमेहकर येथील विज कंपनी कार्यालयामध्ये गेल्या १ वर्षापासून २ शाखा अभियंत्याची पदे रिक्त आहेत. तर अकाऊंट असिस्टंटची १ जागा गेल्या ३ वर्षापासून रिक्त आहे. या रिक्त जागांमुळे कार्यालयातील कामाचा खोळंबा होत आहे.
१४३ गावाचा कारभार केवळ ४९ विज कर्मचाºयांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 1:22 PM
मेहकर : मेहकर उपविभाग विज वितरण कंपनीमध्ये गेल्या अनेक दिवसापासून विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. समस्या वेळेवर सुटत नसल्याने सर्वसामान्य माणूस हैराण झाले आहेत. परंतु मेहकर विज वितरण कंपनीच्या कार्यालयामध्ये विविध विभागात अनेक कर्मचाºयांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे इतर कर्मचाºयांवर कामाचा बोजा वाढत आहे. मेहकर तालुक्यात येणाºया जवळपास १४३ गावाचा ...
ठळक मुद्देमेहकर उपविभाग