बुलडाणा जिल्ह्यात एकूण १३ केंद्रांवर कोराेना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येत आहे. प्रतिदिन एका केंद्रावर किमान महत्तम ५० व्यक्तींना कोरोना लस देण्यात येते. मंगळवार व रविवारी हे लसीकरण बंद असते. त्यातच नोंदणी केलेल्या काही कर्मचाऱ्यांची नावे अद्याप ॲपवर दिसत नाहीत. त्यामुळे अडचणी असल्याचे एका कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. दरम्यान, पहिल्या डोसनंतर १०९२ जणांनी कोरोनाचा दुसरा डोस घेतला आहे. हे सर्व आरोग्य विभागातील कर्मचारी आहेत. फ्रंटलाइन वर्कर्सचे अद्याप दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण झालेले नाही.
--२२ फेब्रुवारीला ८३३ जणांचे लसीकरण--
जिल्ह्यातील सर्व १३ केंद्रांवर २२ फेब्रुवारी रोजी ८३३ जणांचे लसीकरण झाले आहे. यात ६५० आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी ५७९ जणांनी लस घेतली, तर ६५० फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांपैकी २५४ जणांनी लस घेतली. यातील काही जणांची नावे ॲपवर दिसत नसल्याने त्यांना लस देण्यात अडचण येत आहे.
--एकही डोस गेला नाही वाया--
जिल्ह्यात सध्याच्या घडीला ५९,१०० व्हॅक्सीनचे डोस उपलब्ध असून, बुलडाणा येथील डिस्टिक व्हॅक्सीन स्टोअरमध्ये सुसज्ज शीतकरण साखळीमध्ये ते ठेवण्यात आलेले आहे. कोविशिल्डचे ५१,१०० तर को-वॅक्सीनचे ७,१०० डोस उपलब्ध झालेले आहे. जिल्ह्यातील अन्य केंद्रांवर बुलडाणा येथून जवळपास आठवडाभर पुरतील एवढे व्हॅक्सीन देण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.