लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: लॉकडाउनमध्ये अनेक ग्राहकांनी ज्यादा विज देयक आल्याच्या तक्रारी केल्या होत्या. सर्व उद्योग, दुकाने बंद असल्याने अनेकांना रोजगार नव्हता. सध्या अनलॉक प्रक्रीयेंर्तंत व्यवहार सुरळीत होत आहेत. मात्र, तरीही जिल्ह्यातील ४० टक्के ग्राहकांनी लॉकडाउनच्या काळातील एप्रिल ते सप्टेंबर दरम्याचे वीज देयक भरले नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे, आधीच आर्थीक संकटात सापडलेल्या महावितरणसमोर थकबाकी वसुल करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.जिल्ह्यात एकूण ४ लाख ४० हजार ८८२ घरगुती, व्यावसायीक व औद्योगिक ग्राहकांची संख्या आहे. यामध्ये बुलडाणा मंडळात १ लाख ५० हजार १९८, खामगाव मंडळात १ लाख ६५ हजार ४१३ तर मलकापूर मंडळात १ लाख २५ हजार २७१ ग्राहक आहेत. एप्रिल २०२० ते सप्टेंबर २०२० मध्ये बुलडाणा मंडळात ६० कोटी ९५ लाखांचे वीज देयक वितरीत करण्यात आले होते. त्यापैकी २७ कोटी ३७ लाख रुपये वसुल झाले असून ४४ कोटी ८० लाख रुपये थकबाकी आहे. खामगाव मंडळात ७७ कोटी २० लाख रुपयांपैकी ४० कोटी ८५ लाख रुपये वसुल झाले तर मलकापूर मंडळात ५४.६४ कोटी रुपयांपैकी २५ कोटी रुपये वसुल झाले आहेत. त्यामुळे, आधीच संकटात सापडलेल्या महावितरणची आर्थीक कोंडी झाल्याचे चित्र आहे. ग्राहकांनी थकबाकी भरण्याचे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आली आहे.लॉकडाउनमध्ये जादा बिल आल्याची तक्रार करीत अनेक ग्राहकांनी वीज देयक भरले नसल्याने थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आता ही थकबाकी वसूल करण्याचे महावितरणसमोर आव्हान आहे.
६० टक्के ग्राहकांनीच भरले लॉकडाऊनमधील वीज देयक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 4:16 PM