- ब्रम्हानंद जाधवलोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : कोरोना संसर्गामुळे शाळा सुरू नसल्या तरी ऑनलाइन शिक्षण सर्वत्र सुरू आहे. परंतू जिल्ह्यातील निम्याविद्यार्थ्यांनाच मोबाईलद्वारे ऑनलाइन शिक्षण दिल्या जात आहे. त्यातही ग्रामीण भागात मोबाइल शेतात, विद्यार्थी घरी अशी परिस्थिती आहे. जिल्हा परिषद शाळेतून व्हाॅट्स ॲपवर गृहपाठ पाठवून ऑनलाइन शिक्षण पूर्ण केल्या जात आहे. मात्र इतर विद्यार्थ्यांकडे मोबाईल नसल्याने ऑनलाइन शिक्षणात अडचणी येतात. ऑनलाइन शिक्षणामध्ये मोबाइल महत्वाचा असून, जिल्ह्यातील ५७ टक्के पालकांकडे ॲण्ड्राईड मोबाइलच नाही. मोबाइल नसलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाइन शिक्षण पोहचविणे अवघड जात आहे. ऑनलाइन शिक्षणात तांत्रिक अडचणींचा खोडा येत आहे. शिक्षकांनी गृहपाठ तयार करून विद्यार्थ्यांना व्हाॅट्स ॲपवर पाठविण्याचा उपक्रम सुरू केला आहे. अनेक विद्यार्थ्यांना टी. व्ही. केबलद्वारे काहींना इतर माध्यमांद्वारे शिक्षण दिल्या जात आहे.
मोबाईल नसलेल्यांना इतर माध्यमांचा उपयोगमोबाईल नसलेल्यांना टी.व्ही., केबल, दीक्षा ॲप यासारख्या इतर माध्यमांद्वारे शिक्षण देण्यात येत आहे. शाळा बंद असल्या तरी प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचविण्यात येत आहे. जिल्ह्यातील अनेक शाळांनी विद्यार्थ्यांचे व्हाॅट्स ॲपगृप तयार करून त्यावर अभ्यास दिल्या जातो. - उमेश जैन, उपशिक्षणाधिकारी, बुलडाणा.