पेपर जमा करण्यासाठी एप्रिल अखेरची मुदत
विद्यार्थ्यांना घरी पेपर देण्यात येत असून, हे पेपर जमा करण्यासाठी खासगी संस्थांकडून एप्रिल अखेरची मुदत देण्यात आलेली आहे. तर बुलडाण्यातील काही कॉन्व्हेंटनी १० ते १५ एप्रिलपर्यंतच पेपर जमा करण्याचे सांगितलेले आहे. परंतु ज्यांची फी भरलेली नाही, अशा विद्यार्थ्यांना पेपर देण्यात आले नाही.
काय म्हणतात पालक...
कोरोनामुळे अनेकांना काम नाही. त्यात पूर्ण फी कशी भरणार असा प्रश्न पालक संजय जाधव यांनी उपस्थित केला. तर काही पालकांनी शिक्षण विभागाकडे तक्रार केल्यास आमच्या पाल्याला शाळेकडून त्रास होईल, अशी शंका उपस्थित केली.
शैक्षणिक शुल्काअभावी विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवू नये. फी वसुलीबाबत काही नियमावली शासनाने घालून दिलेली आहे. त्यानुसार अंमलबजावणी करावी.
उमेश जैन, उपशिक्षणाधिकारी, बुलडाणा.