सिंदखेडराजा: तालुक्यामध्ये शहरासह गावागावात वस्तीवाड्यावर शासनानेअंगणवाड्या सुरु केल्या. या अंगणवाड्यांमध्ये अनेक मुले केवळ पटावरचशिक्षण घेत असून, प्रत्यक्षात विद्यार्थी उपस्थितच नसल्याचा धक्कादायकप्रकार उघडकीस आला आहे. संवर्ग विकास अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी महेश सुळे यांनी माळसावरगाव सह शहरातील अंगणवाड्यांना ३ जुलै रोजी सकाळी ९.३० ते ११ वाजताभेटी दिल्या. सावरगाव माळ येथील अंगणवाडीत एकही बालक आढळून आला नाही.सिंदखेडराजा तालुक्यामध्ये २०३ अंगणवाडी व ७ मीनी अंगणवाडी अशा २१०अंगणवाड्या आहेत. त्यामध्ये ६ हजार ७६० मुले व ५ हजार ९७८ मुली अशी एकूण१२ हजार ७३८ पटसंख्या कागदोपत्री नोंद आहे. ९ जुन्या व ६८ अंगणवाड्यंनानविन इमारती आहेत. अंगणवाडीची वेळ सकाळी ८ ते दुपारी १२ पर्यंत आहे. ६महिने ते ३ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना शिरा ९६० ग्रॅम, उममा ९६०ग्रॅम, सातु ९६० ग्रॅम व पॅकबंद पाकीट पंचविस दिवसासाठी तीन पाकीट घरपोचची सुविधा आहे. गरोदर स्तनदा मातांना शिरा ११२० ग्रॅम, उपमा सुकळी ११२०ग्रॅम व पॅकबंद पाकीट २५ दिवसासाठी ३ पाकीट घरपोच, ३ ते ६ वर्षलाभार्थ्यांना गरम ताजा आहार खिचडी, कडधान्य, उसळ, लापसी ९० ग्रॅम तांदूळव १० ग्रॅम दाळ, २० ग्रॅम मटकी, २० ग्रॅम वटाना उसळ दररोज केंद्रामध्येदेण्यात यावा. किशोर मुली १५ ते १८ वयोगटातील उपमा, सातु, शिरा व २५दिवसासाठी ३ पॅकबंद पाकीट घरपोच देण्याचा शासन प्रयत्न करीत आहे. मात्र३ जुलै रोजी आमचे प्रतिनिधी व संवर्ग विकास अधिकारी तथा बालविकास प्रकल्पअधिकारी महेश सुळे यांनी माळ सावरगाव येथील अंगणवाडीला भेट दिली असताएकही बालक उपस्थित नव्हते. बालकांच्या घरोघरी जाऊन पालकांच्या भेटीघेतल्या असता बालक अंगणवाडीत किती वाजता जाते किती वाजता घरी येते,बालकांना पोषण आहार काय दिल्या जातो तर तांदळाच्या खिचडी शिवाय काहीसांगता आले नाही. बालकांना पूर्वशालेय शिक्षण, गीत, गाणे, खेळ शिकविल्याजाते काय, याबद्दल पालक अनभिज्ञ असून शेतामध्ये कामे सुरु असल्यामुळेबालकांना शेतात घेऊन जावे लागते. अंगणवाड्या प्रकल्पा संदर्भात पालकसंभ्रमावस्थेत दिसले. तर सिंदखेडराजा येथील अंगणवाड्यांना सकाळी ९ ते १०वाजता भेटी दिल्या असता तीन अंगणवाड्यांना ताळे लावलेले असून त्या बंदचदिसल्या, अशीच अवस्था तालुक्यातील बहुसंख्य अंगणवाड्यांची असूनप्रशासनातील यंत्रणेची उदासिनता दिसून आली. शासनाचा हेतु साध्यकरण्यासाठी शासन, स्थानिक शासकीय यंत्रणा, ग्रामपंचायत, पदाधिकारी व पालकयांनी समन्वयाने योजनेचा उद्देश सफल करण्यासाठी कठोर प्रयत्न व वैयक्तीकसहभाग नोंदविणे काळाची गरज आहे. (शहर प्रतिनिधी)
अंगणवाडीत विद्यार्थी केवळ पटावरच
By admin | Published: July 05, 2017 1:50 PM