लोकमत न्यूज नेटवर्कसाखरखेर्डा : गुरुंनी केलेला उपदेश हा महत्त्वाचा असून, तो श्रवण करताना घेणाराही तेवढाच ज्ञानी हवा, असा उपदेश श्रीमद् जगद्गुरू शंकराचार्य श्री विद्या नृसिंह स्वामी महाराज यांनी दिला.प्रल्हाद महाराज शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सवानिमित्त संत संमेलनात ते बोलत होते. यावेळी विचार पीठावर सद्गुरू १00८ सिद्धलिंग शिवाचार्य स्वामी, गणेश्वर शास्त्री द्रावीड, नाना महाराज लोणीकर, विजयकाका पोफळी, सुरेश महाराज ब्रम्हचारी, नरेंद्र महाराज चौधरी, भास्कर महाराज उपस्थित होते.शंकराचार्य प्रबोधनातून बोलताना म्हणाले की, श्रीरामचंद्रांनी लंकेश्वरावर विजय मिळविल्यानंतर अयोध्या नगरीत आले. त्याठिकाणी विजय उत्सव साजरा करण्याचे ठरले. त्यावेळी सर्व राजांना आमंत्रित करण्यात आले. त्याचक्षणी सर्व राजे उभे राहून विश्वमित्राचा सन्मान करू लागले; परंतु एक राजा तसाच बसून होता. त्यांच्यावर नजर गेली. माझा घोर अपमान करणार्या या राजाला कठोर शिक्षा करण्याचे श्रीरामाला फर्मान सोडले. श्रीरामांनी मृत्यूदंडाची शिक्षा करण्याचे वचन विश्वमित्राला दिले; परंतु चार दिवसांपासून मृत्यूदंडाची शिक्षा ऐकून तो राजा गलीतगात्र झाला होता. काय करावे, हे सुचत नव्हते. तेवढय़ात हनुमंतांनी डाव्या खांद्यावर त्या राजाला घेतले. श्रीरामाचा पारा चढला. माझाच भक्त हे काम करतो. तेवढय़ात भात्यातील एक-एक बाण काढून त्या राजाला मारणार तेवढय़ात हनुमंतांनी उजव्या कानात मंत्र दिला. तो मंत्र राजाने उच्चारला, अशा प्रकारे राम नामाचा मंत्र सांगितल्याने राजाचे प्राण वाचले. तेव्हा नारदमुनी आणि हनुमान यांनी रामाचे चरण धरुन म्हणाले की, श्रीरामापेक्षा श्रीराम नामातच एवढी शक्ती आहे की, ती संकटेसुद्धा दूर करते, त्यामुळे प्रत्येकाने श्रीरामाचा जप मनोभावे करावा. गुरुंनी शिष्यांना गुरू प्रमाणेच मान द्यावा. त्यात अंतर असू नये. प्रल्हाद महाराज यांनीसुद्धा श्रीराम नामाचा जप केला. ज्ञानेश्वर महाराजांनीसुद्धा गुरुने गुरुच करावा, असे तत्त्वज्ञान सांगितले आहे. मनुष्याच्या मनात संशय नसावा, त्यांनी निसंकोच कार्य करावे, ते कार्य निश्चित सिद्धीला जाते.नरेंद्र महाराज अकोला यांनी नाथ पंथाचे तत्त्वज्ञान सांगताना जात, धर्म, पंथ न पाळता मनुष्याने सेवाकार्य करावे, तेच कार्य प्रल्हाद महाराज यांनी केले, असे प्रबोधन केले. यावेळी विचार पीठावरील सर्वच गुरुजनांनी प्रबोधन केले. प्रास्ताविक, मनोगत आचार्य रामदासपंत यांनी मांडले.
उपदेश करताना श्रवण करणाराही तेवढाच ज्ञानी हवा - शंकराचार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 12:43 AM
साखरखेर्डा : गुरुंनी केलेला उपदेश हा महत्त्वाचा असून, तो श्रवण करताना घेणाराही तेवढाच ज्ञानी हवा, असा उपदेश श्रीमद् जगद्गुरू शंकराचार्य श्री विद्या नृसिंह स्वामी महाराज यांनी दिला.
ठळक मुद्देशंकराचार्य श्री विद्या नृसिंह स्वामी महाराज यांचा उपदेश