लोकमत न्यूज नेटवर्क धामणगाव बढे : मोताळा पंचायत समिती अंतर्गत १४ ऑक्टोबर रोजी रोहिणखेड, थड, किन्होळा, पान्हेरा या परिसरात २१ टमरेल बहाद्दरांवर कारवाई करण्यात आली आहे. मोताळा पंचायत समितीच्या गुड मॉर्निंग पथकाने भारत स्वच्छ मिशन अंतर्गत शासकीय स्तरावर विविध उपक्रम राबवित अस ताना या उपक्रमाचा एक भाग म्हणून १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ५ वाजतापासून प्रथम रोहिणखेडपासून या कारवाईची सुरुवात केली. यामध्ये रोहिणखेड येथील नीलेश रमेश पोकळे, विलास प्रकाश होडगरे, जगन्नाथ एकनाथ अढाव थड येथे युवराज देशराज शिराळे, निखिल जगन्नाथ पवार, राजू एकनाथ गोरे, शंकर भगवान टेकाळे, किन्होळा येथे रमेश ओंकार किन्होळकर, सुधाकर त्र्यंबक गायकवाड, चंद्रभान माणिक सुरडकर, विश्वनाथ वसंत कुर्हाडे, रमेश सावळा कुर्हाळे, दिनकर सुगदेव गवई, संतोष तुळशीराम कुर्हाडे, तर पानहेरा विजय चंद्रभान जाधव, रामभाऊ शंकर इंगळे, प्रल्हाद झाडू वैराळकर, वच्छलाबाई जगदेव जाधव, तुकाराम गंगाराम शिंदे, प्रल्हाद विठोबा वैराळकर, शुभम गजानन सोनोने या टमरेल बहाद्दरांना उघड्यावर शौचास न बसण्याची ताकीद देण्यात येऊन सोडण्यात आले. या गुड मॉर्निंंग पथकामध्ये पथक प्रमुख पी.एस. मोरे, व्ही.के. राठोड, रामप्रसाद मुंडे, गोकूल बोरसे, निळू डाखोरकर, राजेंद्र वैराळकर इ. पंचायत समिती कर्मचारी सहभागी होते. या कारवाईमुळे उघड्यावर शौचास बसणार्या टमरे बहाद्दरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अशा प्रकारची कारवाई धामण्गाव बढे व परिसरात सतत झाल्यास टमरेल बहाद्दरांची सं ख्या निश्चितच कमी होईल.
२१ टमरेल बहाद्दरांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 1:07 AM
धामणगाव बढे : मोताळा पंचायत समिती अंतर्गत १४ ऑक्टोबर रोजी रोहिणखेड, थड, किन्होळा, पान्हेरा या परिसरात २१ टमरेल बहाद्दरांवर कारवाई करण्यात आली आहे.
ठळक मुद्देस्वच्छ भारत अभियानमोताळा पंचायत समितीच्या गुड मॉर्निंग पथकाची कारवाई