लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: स्थानिक नगर पालिकेतील स्पर्धात्मक निविदा हरताळ प्रकरणी आता जिल्हाधिकारी स्तरावरून चौकशीचे संकेत आहेत. या प्रकाराची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याची मागणी माजी नगराध्यक्षा तथा काँग्रेस नगरसेविका सरस्वतीताई खासने यांनी रविवारी पालकमंत्री ना. शिंगणे यांच्याकडे केली. खासणे यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करण्याचे निर्देश ना. शिंगणे यांनी जिल्हाधिकाºयांना दिले आहेत.मिनी हायमास्ट उभारणीत भ्रष्टाचार करण्याच्या उदद्ेशाने संगनमत करुन नगराध्यक्षा अनिता डवरे यांच्या आदेशाने निवीदा उघडण्यात आल्या. संबंधीत ठेकेदाराला मुख्याधिकारी न.प.खामगांव यांनी उक्त कामाचा कायार्रंभ आदेश दिला. याबाबत माजी नगराध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने यांनी पालकमंत्री यांच्याकडे तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत पालकमंत्री ना.डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी मिनी हायमास्ट प्रकरणी झालेल्या निविदे प्रक्रियेची त्वरीत चैकशी करुन कार्यवाही करा असे आदेश २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी बुलडाणा यांना दिले आहेत. दरम्यान, नागरी दलीत वस्ती योजनेंतर्गत खामगांव शहरातील विविध भागातील मिनी हायमास्ट लावण्यासाठी एकाच कंत्राटदाराने आपल्या निविदेसह २ पुरक निविदा पालिकेला सादर केल्या असल्याची माहिती वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या बातम्यांच्या माध्यमातून मिळाली होती. याबाबत माजी नगराध्यक्षा श्रीमती खासने यांनी माहितीच्या अधिकारात मुख्याधिकारी यांच्याकडुन माहिती मागितली असता ते माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याचेही खासने यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
खामगाव पालिकेत निविदा मॅनेज करण्याचा गोरखधंदा सुरू आहे. मिनी हायमास्ट निवीदा प्रक्रिया ते वर्क आॅर्डर पुर्वीच्या प्रक्रियेदरम्यान आपण या पुर्वी तक्रार केली आहे. या प्रकरणाची माहिती देण्यास मुख्याधिकारी टाळाटाळ करीत आहे. हे प्रकरण राजकीय दबावाखाली दाबल्या जाण्याची शक्यता सुध्दा नाकारता येत नाही. या गंभीर प्रकरणाची पालकमंत्रींसह वरीष्ठांकडे तक्रार केली असुन चौकशी नंतर या प्रकरणातील सत्य बाहेर येईल.- सरस्वती खासनेमाजी नगराध्यक्षा, खामगाव.