शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

स्वस्त धान्य दुकान तपासणीचा अहवाल सादर करण्याचा आदेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 11:50 PM

बुलडाणा : जिल्ह्यातील अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय लाभार्थ्यांची संख्या ६६ हजार ४९६ असून, त्यांच्यासाठी सप्टेंबर महिन्यात गहू १३ हजार ९६0 व तांदूळ ९ हजार ३१0 क्विंटल पुरवठा करण्यात आला  आहे; मात्र जिल्ह्यात राशनचा माल काळा बाजारात विक्री होण्याचे प्रमाण वाढल्याने अनेक लाभार्थ्यांना या धान्याचा लाभ मिळत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांची तपासणी करून तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यात अंत्योदयचे ६६ हजार लाभार्थी राशनची काळा बाजारात विक्री वाढली!

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : जिल्ह्यातील अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय लाभार्थ्यांची संख्या ६६ हजार ४९६ असून, त्यांच्यासाठी सप्टेंबर महिन्यात गहू १३ हजार ९६0 व तांदूळ ९ हजार ३१0 क्विंटल पुरवठा करण्यात आला  आहे; मात्र जिल्ह्यात राशनचा माल काळा बाजारात विक्री होण्याचे प्रमाण वाढल्याने अनेक लाभार्थ्यांना या धान्याचा लाभ मिळत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांची तपासणी करून तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले आहेत.जिल्ह्यात शासकीय अन्न धान्याचा काळाबाजार वाढत असल्याने गोरगरिबांना राशनच्या मालापासून वंचित रहावे लागत आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम, २0१३ अंतर्गत अंत्योदय लाभार्थ्यांसाठी दरमहा हजारो क्विंटल धान्याचा पुरवठा स्वस्त धान्य दुकानदारांना करण्यात येतो. जिल्ह्यात अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय लाभार्थ्यांची संख्या ६६ हजार ४९६ आहे.  अंत्योदय लाभार्थ्यांसाठी सप्टेंबर महिन्याचे  धान्य गहू व तांदूळ धान्याची शासकीय गोदामात  वाहतूक करण्याचे आदेश या महिन्याच्या सुरूवातीलाच देण्यात आले होते.  त्यासाठी भारतीय अन्न महामंडळाच्या ब्लॅक स्टोन लॉजिस्टीक्स प्रा. लि. खामगाव यांच्या  गोदामातून १५ सप्टेंबरपर्यंत या धान्याची उचल करण्यात आली. त्यामध्ये बुलडाणा तालुक्यासाठी गहू १ हजार ६६७ क्विंटल व तांदूळ ९00 क्विंटल,  चिखली गहू ५५६ क्विंटल व तांदूळ ९00 क्विंटल, अमडापूर गहू ३३८ क्विंटल व तांदूळ १00 क्विंटल,  देऊळगाव राजा गहू ७00 व तांदूळ ७00,  मेहकर गहू ७७६ व तांदूळ १ हजार क्विंटल, डोणगाव गहू ३३८ व तांदूळ १00 क्विंटल, लोणार गहू १ हजार ६७८ व तांदूळ १ हजार २00 क्विंटल,  सिंदखेड राजा गहू ७७२ व तांदूळ ८00, साखरखेर्डा गहू ६१४ व तांदूळ २५0 क्विंटल, मलकापूर गहू १ हजार ११७ व तांदूळ ५00 क्विंटल, मोताळा गहू १ हजार ४१४  व तांदूळ ६00 क्विंटल, नांदूरा गहू १ हजार १४८  व तांदूळ ६00 क्विंटल, खामगाव गहू १ हजार २0४ व तांदूळ ३५0 क्विंटल, शेगाव गहू ५६३  व तांदूळ २५0 क्विंटल, जळगाव जामोद गहू ३४१ व तांदूळ ४५0 क्विंटल, संग्रामपूर गहू ७३८ व तांदूळ ६१0 क्विंटल  पुरवठा करण्यात आला. जिल्ह्यात अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय लाभार्थ्यांसाठी एकूण गहू १३ हजार ९६0 व तांदूळ ९ हजार ३१0 क्विंटल पुरवठा करण्यात आला आहे. धान्याचा वाढता काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांची तपासणी केल्यानंतर तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पुलकुंडवार यांनी दिले आहेत.    

मध्येच गायब होणार्‍या मालाची चौकशी गरजेची शासकीय धान्य गोदामातून उचल करण्यात आलेले धान्य मध्येच गायब होत असल्याचे प्रकार वाढले आहेत. ज्या ठिकाणी धान्याचा काळाबाजार उघड झाला, त्याची थातुरमातूर चौकशी करून पुन्हा प्रकरण फाइलबंद होते; मात्र त्यानंतर पुन्हा पुढच्या महिन्यात शासकीय गोदामातून उचल झालेले धान्य स्वस्त धान्य दुकानांपर्यंत जाण्याआधीच कमी होते. त्यामुळे मध्येच गायब होणार्‍या मालाची चौकशी लावणे गरजेचे आहे.