या ऑनलाईन मेळाव्यात नामांकित खासगी उद्योजक कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहून ऑनलाईन भरती प्रक्रिया राबविणार आहे. या भरतीमध्ये पात्र पुरुष, महिला उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखती घेण्यात येऊन पात्र उमेदवारांची निवड करण्यात येईल. उमेदवारांनी नाव नोंदणी केलेल्या दहावी, बारावी, पदवी, नर्सिंग पदविका, (ए.एन. एम.,जी.एन.एस.) आय. टी. आय. पास, पदव्युत्तर, पुरुष व महिला उमेदवारांनी आपले सेवायोजन कार्डचा आयडी व पासवर्डचा वापर करून आपले लॉग ईनमधून ऑनलाईन अर्ज करून सहभाग नोंदणी करून रोजगार प्राप्त करावा. रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याकरिता कार्यालयात येण्याची गरज नाही. उमेदवार जेथे असतील त्याच ठिकाणावरून आपल्या सेवायोजना कार्डचा युझर व पासवर्डचा वापर करून आपल्या लॉग इनमधून ऑनलाईन रोजगार मेळाव्यात ऑनलाईन पद्धतीने सहभागी होऊ शकतात. पात्र असलेल्या पुरुष, महिला उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे एका पेक्षा जास्त पदाकरिता सुद्धा ऑनलाईन अर्ज करू शकतात. या रोजगार मेळाव्यात उमेदवारांना रोजगार संधी सोबतच विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रसारण व्यंकटेश महाविद्यालय देऊळगाव राजा यु ट्युब वाहिनीवर करण्यात येणार आहे. रोजगार मेळाव्याचे उद्घाटन समारंभ २७ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करताना काही अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाला संपर्क साधावा. जास्तीत जास्त उमेदवारांनी ऑनलाईन सहभाग नोंदवावा, असे आवाहन व्यंकटेश महाविद्यालयाचे डॉ. सुधीर चव्हाण, डॉ अनंत आवटी, सहायक आयुक्त सु. रा. झळके, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी केले आहे.
पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 4:35 AM