विवेक चांदूरकर बुलडाणा, दि. 0८- दिवसेंदिवस गतीमान क्रिकेटचे वेड लागत असून, कसोटी, एक दिवसीयनंतर व्टेंटी - २0 क्रिकेटकडे क्रिकेट जगत वळले आहे. मात्र, आता हा खेळ आणखी छोटा झाला असून, राज्यभर सूपर सेव्हन क्रिकेटवर भर देण्यात येत आहे. सूपर सेव्हन क्रिकेटचा प्रचार प्रसार होण्याकरिता राज्य शासनाच्या क्रीडा विभागाच्यावतीने शालेय स्पर्धा भरविण्यात येत आहे. पहिली राज्यस्तरीय स्पर्धा बुलडाणा येथे १0 ते १२ ऑक्टोबर दरम्यान आयोजित केली आहे. शासनाच्या क्रीडा विभागाच्यावतीने या खेळाचा प्रचार प्रसार करण्याकरिता विविध प्रयत्न करण्यात येणार आहे. याकरिता प्रत्येक जिल्हास्तरावर जिल्हा सेव्हन क्रिकेट असोसिएशनची स्थापणा करण्यात आली आहे. शालेय स्तरावर १९ वर्षाखालील विद्यार्थ्यांची राज्यातील पहिली स्पर्धा बुलडाणा येथील क्रीडा संकूलावर आयोजित करण्यात आली आहे. या असोसिएशनच्यावतीने खेळाडूंना प्रशिक्षण देण्यात येणार असून, स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल. क्रीडा विभाग व बुलडाणा जिल्हा क्रिकेट सेव्हन असोसिएशनच्यावतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये राज्यातील आठ विभागातील संघ सहभागी होणार आहे. यानंतर आंध्रप्रदेशात १३ व १४ ऑक्टोबर रोजी देशपातळीवरील स्पर्धा होणार आहेत. यामध्ये २८ राज्यातील संघ सहभागी होणार आहेत. बुलडाणा येथे आयोजित स्पर्धेतून आंधप्रदेशातील स्पर्धेसाठी संघाची निवड करण्यात येणार आहे. - सात खेळाडूंचा संघ सुपर सेव्हन क्रिकेट संघात केवळ सातच खेळाडू असणार आहेत. पूर्ण संघात १२ खेळाडू राहणार असून, मैदानावर सात खेळाडू खेळतील तर पाच खेळाडू अतिरिक्त राहतील. प्रत्येक गोलंदाजाला दोन षटकांची र्मयादा असणार आहे. - क्रीडा विभागाच्यावतीने सुपर सेव्हन क्रिकेटकडे शालेय खेळाडू वळावे याकरिता राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. बुलडाणा येथे सदर स्पर्धा १0 ते १२ ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आली असून, यातून राज्यस्तरीय संघाची निवड करण्यात येणार आहे. - अशोक गिरीजिल्हा क्रीडा अधिकारी, बुलडाणा
बुलडाण्यात ‘सूपर सेव्हन’ शालेय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
By admin | Published: October 09, 2016 2:11 AM